Kareena Kapoor Never Met Amrita Singh : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं अमृता सिंगशी पहिलं लग्न केलं होतं. पण काही वर्षांनंतर अर्थात 2004 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर करीना कपूरशी सैफनं कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर अमृता आणि सैफ भेटल्याचं आपण कधी पाहिलं नाही. मात्र, एका जुन्या मुलाखतीत त्या दोघांनी एकमेकांविषयी काही चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. एका मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत बेबोनं साराची आई अमृताची ती फॅन असल्याचं सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना कपूरनं 2008 मध्ये 'पीपुल मॅग्झिन'शी बोलताना स्वत: ला अमृता सिंगचं फॅन असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी तिनं सांगितलं होतं की तिची इच्छा आहे की सैफनं त्याची एक्स पत्नी म्हणजेच पूर्वाश्रमीची पत्नी अमृतासोबत मैत्री करायला हवी. जेव्हा करीनाला प्रश्न विचारण्यात आला की सैफ अली खान आणि तिच्यात त्यांच्या आधीच्या रिलेशनशिप्सवर काही बोलणं होतं का? करीनानं सांगितलं की 'मी या गोष्टीचा सन्मान करते की सैफचं आधी लग्न झालं होतं आणि त्याला दोन गोंडस मुलं आहेत. मी अमृता सिंगची चाहती आहे.'



करीना पुढे म्हणाली की 'मी कधी अमृता सिंगला भेटली नाही, पण मी तिला तिच्या चित्रपटांमधून ओळखते. माझ्यासाठी ती नेहमीच सैफच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती राहिल आणि हिच गोष्ट मी सैफला देखील सांगितली आहे. माझी इच्छा आहे की तिला नेहमी तो सन्मान मिळावा. हेच मला माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलं आहे.'


करीनानं पुढे सांगितलं की 'शेवटी, त्यांचं लग्न झालं होतं. ते लग्न अपयशी ठरलं असलं तरी देखील लग्न झालं होतं. मी नेहमीच सैफला तिच्याशी मैत्री कर असं म्हटलं आहे. कारण मला वाटतं की हेच योग्य आहे. मला वाटतं की त्या दोघांना अजून वेळेची गरज आहे, पण काही गोष्टी आहेत ज्यांना त्यांना सामोरं जावं लागणार. मला कायम अमृताचा आदर राहिला आहे.' 


हेही वाचा : Bangladesh Unrest: प्रसिद्ध अभिनेत्यासह त्याच्या वडिलांची मॉब लिन्चिंग! कोलकात्यातही शोककळा


करीनाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती सगळ्यात शेवटी क्रिती सेनन आणि तब्बूसोबत 'क्रू' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. दरम्यान, करीनाकडे आणखी बरेच प्रोजेक्ट आहेत. त्याकडे आता सगळ्यांचे लक्ष आहे.