मुंबई : करिना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधील सर्वात शक्तिशाली कपलपैकी एक आहेत. 'टशन'  सिनेमादरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. ते एकमेकांशी कसे जोडलेले आहेत हे त्यांनी नंतर उघड केले. सैफ इंस्टाग्रामवर फारसा सक्रिय नसला तरी करीना ही सोशल मीडिया क्वीन आहे आणि ती तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल जीवनाशी संबंधित गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. या कपलने 2012 मध्ये लग्न केलं आणि ते दोन मुलांचे पालक बनले आहेत. एका रिपोर्टनुसार, दोघंही लग्नाआधी अनेक वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मुलाखतीत करिना म्हणाली होती की, मला माझ्या आयुष्यात अशा लोकांचा आशीर्वाद मिळाला आहे ज्यांनी मला पूर्ण साथ दिली. जेव्हा मला वाटलं की, मी पडत आहे, तेव्हा सैफने माझी काळजी घेतली मला सावरलं. मी त्याला आधीही भेटले होते, पण जेव्हा आम्ही टशनचं शूटिंग करत होतो तेव्हा खूप काही बदललं होतं. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे आणि त्याला 2 मुलं आहेत. पण माझ्यासाठी तो फक्त सैफ आहे. त्याने मला ठिक करण्यास आणि स्वतःवर प्रेम करण्यास मदत केली. मी गोष्टींचा समतोल राखायला शिकले.


करिनाला तिच्या आईची बबिता कपूरची रिएक्शनही आठवली. जेव्हा सैफने तिला विचारलं की, बेबो त्याच्यासोबत राहू शकते का? तेव्हा सैफ म्हणाला की, तो 25 वर्षांचा नाही आणि रोज रात्री तिला घर सोडू शकत नाही, म्हणून तो त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला, 'मला माझे आयुष्य तिच्यासोबत घालवायचं आहे. आम्हाला एकत्र राहायचं आहे. यावर बबिता शांत असल्याचे करीना म्हणाली.


अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये मुंबईत लग्न केलं. हे जोडपं 2016 मध्ये त्यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान आणि 2021 मध्ये दुसरा मुलगा जेह याचे पालक झाले.