मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने पहिल्या गरोदरपणातही आपलं काम सुरू ठेवलं होतं. त्याचवेळी, जन्मानंतर तैमूर अली खानही रातोरात भारताचा लाडका स्टार किड बनला. गेल्या वर्षी करिनाने  दुसरा मुलगा जहांगीरला जन्म दिला. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, एक वेळ अशी होती जेव्हा करिना नैसर्गिकरित्या आई होण्याऐवजी सरोगसीचा विचार करत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरोगसीच्या माध्यमातून आई व्हायचं होतं
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर खानच्या 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी' या पुस्तकात याचा उल्लेख करण्यात आला आहे. पती सैफ अली खानने खुलासा केला आहे की, तिने तिच्या पहिल्या मुलाच्या नियोजनादरम्यान सरोगसीद्वारे आई होण्याच्या पर्यायावर चर्चा केली होती.


एका रिपोर्टनुसार, सैफ अली खानने पत्नी करीना कपूर खानच्या पुस्तक 'प्रेग्नन्सी बायबल: द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी'मध्ये लिहिलं आहे की, करीनाने आई बनण्यासाठी सरोगसीचा विचार केला होता. छोटे नवाबने हेही उघड केलं की जेव्हा त्याने करीनाला डेट करायला सुरुवात केली तेव्हा तिची साईज झीरो होती.


सैफने खुलासा केला
सैफ अली खानने लिहिलं, 'आपल्या इंडस्ट्रीतली ही अभिनेत्री खूप दबावाखाली जगते.  आम्ही आमचं नातं सुरू केलं तेव्हा तिची फिगर झिरो होती. तेव्हा ती लहान मुलांच्या दुकानातून कपडे खरेदी करायची.  कारण तिथे फक्त तिच्या फिटिंगचे कपडे मिळत होते. तिची कारकीर्दही चांगली चालली होती. सरोगसी टाळून नैसर्गिकरित्या मूल जन्माला घालण्याच्या निर्णयासाठी करीनाने स्वत:ला तयार करण्यासाठी वेळ घेतल्याचंही सैफने उघड केलं.