Kareena Kapoor Cheapest Dress: करीना कपूर सध्या आपल्या परिवारासोबत इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. सैफ अली खान आणि आपल्या दोन्ही मुलांसह आणि मित्रमैत्रीणींसह ती इटलीमध्ये आपली वेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे. करीना आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते सोबतच ती आपल्या महागड्या कपड्यांमुळे अधिकच चर्चेत असते. परंतु सध्या तिच्या एका ड्रेसची चांगलीच चर्चा रंगली आहे. इटलीत जाऊन करीनानं इतका स्वस्त ड्रेस घातला आहे की सध्या त्या ड्रेसचीच सगळीकडेच चर्चा रंगली आहे. या ड्रेसमध्ये ती अत्यंत सुंदर दिसते आहे. सोबतच यावेळी तिनं ब्लॅक एण्ड व्हाईट स्ट्राईप्सचा वनपीस परिधान केला आहे. त्यामुळे यावेळी ती इटलीच्या बॅगराऊंडला शोभेल अशा आऊटफिटमध्ये दिसते आहे. सोबतच यावेळी तिनं आपल्या पतीसोबत सैफ अली खानसोबत पोझ दिली आहे. 


सेलिब्रेटींना आवडू लागले आहेत स्वस्त कपडे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण सेलिब्रेटींच्या आऊटफिट्सवर बोलायला गेलो तर त्यासाठी आपल्यासमोर येतात ते लाखो आणि करोडो रूपयांचे ड्रेस त्यामुळे त्या ड्रेसची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. अशाच आता अनेक सेलिब्रेटी हे आपल्या खर्चाकडे फारच गांभीर्यानं पाहाताना दिसत आहेत. सध्या स्वस्त कपड्यांचाही अनेक सेलिब्रेटींना नाद लागला आहे. त्यातून कमी खर्च, योग्य ठिकाणी खर्च आणि कपड्यांवरही कमी खर्च ठेवण्याकडे आता सर्वांचाच कल वाढू लागला आहे की काय असं दिसतं आहे. त्यातून आता करीनानंही याची दमदार सुरूवात केली आहे की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यातून आता आपल्या इटली टूरमुळे करीना चांगलीच चर्चेत आली आहे. तुम्हाला माहितीये का की सध्या व्हायरल होणाऱ्या तिच्या ड्रेसची किंमत नक्की आहे तरी किती? 


हेही वाचा - नो मेकअप लुकमध्ये अशी दिसते सोनम कपूर; डार्क सर्कल्स पाहून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का


बापरे करीनाचा ड्रेस इतका स्वस्त?


विरेंद्र चावला या पापाराझी पेजनं आपल्या इन्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे ज्यात काही सेलिब्रेटी आणि त्यांच्या ड्रेसेसची किंमत शेअर केली आहे. तेव्हा यावेळी इटलीली गेलेल्या करीनाच्या ड्रेसची किंमतही यावेळी शेअर करण्यात आली आहे. तिनं हा वनपीस H&M चा परिधान केलेला आहे आणि त्याची किंमत ही 1499 रूपये इतकी आहे. त्यामुळे इतक्या स्वस्त ड्रेसची किंमत पाहून चाहतेही चक्रावले आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 



'द क्रु' हा तिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटिंग पुर्ण झाले आहे. ज्याची माहिती करीनानं सोशल मीडियावरून दिली होती. या चित्रपटातून तब्बू, करीन कपूर आणि क्रिती सनन ही ड्रीम कास्ट दिसणार आहे.