फोटोज : India Couture Week मध्ये करिनाचा जलवा...
दरवर्षीप्रमाणे यंदाही India Couture Week दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये सुरु झाला आहे.
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही India Couture Week दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये सुरु झाला आहे. फॅशन वीकच्या दुसऱ्या दिवसी करिना कपूर खान डिजाईनर फाल्गुनी शेन पीकॉकच्या शोची खास आकर्षण ठरली. डिजाईनर फाल्गुनी शेन पीकॉकने डिजाईन केलेल्या गोल्डन लहेंग्यात तिने रॅम्पवॉक केला. या लहेंग्याचे वजन ३० किलो होते.
फुल स्लीव्ज ब्लाऊज, ए लाईन लेहंगा आणि फेदर लेस दुपट्टा यात करिना खूप स्टनिंग दिसत आहे. क्रिस्टल वर्कने भरलेला हा लेहंगा राजस्थानच्या जुनागड पॅलेसपासून प्रेरीत झालेला होता. खुद्द करिनाने खुलासा केला की, हा लेहंगा सांभाळणे तिच्यासाठी सोपे नव्हते. ३० किलोचा हा लेहंगा परिधान केल्यानंतर मला वाटले की माझी पाठ नाहीच आहे.
दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये हा फॅशन वीक सुरु आहे. पहिल्या दिवशी डिजाईनर अंजू मोदीसाठी कंगना रानौत शो टॉपर ठरली. २५ जुलैला सुरु झालेला हा फॅशन शो २९ जुलैपर्यंत चालेल.
तैमुरच्या जन्मानंतर वीरे दी वेडींग सिनेमातून करिनाने मोठ्या पडद्यावर कमबॅक केले. या सिनेमात करिनासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या अभिनेत्री होत्या. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
ट्रेंड एनालिस्ट तरण आदर्शनुसार, वीरे दी वेडींग हा या वर्षातील ५ वी मोठी ओपनिंग असलेली सिनेमा ठरला.
आता सध्या करिना कपूरने करण जोहरची निर्मिती असलेला एक सिनेमा साईन केला आहे. याचे दिग्दर्शन राज मेहता करणार आहे. या सिनेमात करिनासोबत अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असून सिनेमाचे शूटिंग २०१९ मध्ये सुरु होईल.