मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या चित्रपटांच्या नाही, तर त्यांच्या अफेयर्सबद्दल अधिक चर्चा रंगत असतात. अभिनेत्री करीना कपूर खान देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न करण्यापूर्वी ती अभिनेता शाहीद कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे नातं फआर काळ काही टिकू शकलं नाही. 'जब व्ही मेट' चित्रपटानंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्यानंतर करीना सैफ अली खानसोबत 'टशन' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जब व्ही मेट' आणि 'टशन' चित्रपटांमुळे करीनाचं आयुष्य पूर्ण बदललं. करीनाच्या अनेक चाहत्यांना माहिती आहे, की 'जब व्ही मेट' चित्रपटासाठी शाहीदने करीनाचं नाव पुढे केलं होतं. शाहीदमुळे करीनाला 'जब व्ही मेट' चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तर 'टशन' चित्रपटाच्या माध्यमातून तिला तिच्या आयुष्याचा जोडीदार भेटला. 



'टशन' चित्रपटाच्या सेटवर  करीना आणि सैफची भेट झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमाचा गुलाब बहरला.  शाहीदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीनाने सैफसोबत तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात केली. एका मुलाखतीत करीनाने तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना सांगितल्या. यावेळी तिने शाहीद कपूर आणि सैफ अली खान दोघांचा उल्लेख केला. 


करीना म्हणाली, 'मी टशन चित्रपटाची शुटिंग करत होती. पण 'जब व्ही मेट' चित्रपटानंतर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलल्या. 'जब व्ही मेट' चित्रपटानंतर आमचे मार्ग वेगळे झाले. चित्रपट सुपरहीट ठरला. 'टशन' चित्रपटाने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. तर शाहीद आणि  'जब व्ही मेट'ने करियर बदललं. मला माझ्या स्वप्नांचा राजकुमार भेटला आणि मी त्याच्यासोबत लग्न केलं. '