सैफच्या पहिल्या पत्नीविषयी करिनाचा खुलासा
मला अमृताचा आदर - करिना कपूर
मुंबई : बॉलिवूड बेबो करिना कपूर खान आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा या दोघींनी करण जौहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. करणच्या 'कॉफी विथ करण'मध्ये नेहमीच वेगवेगळे खुलासे होत असतात. असाच एक खुलासा करिना कपूर खानने अमृता सिंग यांच्याबाबत केला आहे. शोमध्ये करणने सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग यांच्याविषयी कधी अमृता सिंगशी बोलणं झालं का? असा प्रश्न विचरला. त्यावर करिनाने मला अमृता यांच्याविषयी अतिशय आदर आहे. पण मी अजून एकदाही अमृता सिंग यांना भेटली नसल्याचं करिनाने सांगितलं.
करणच्या प्रश्नावर उत्तर देत करिनाने मी कधीही अमृता सिंह यांनी भेटली नसल्याचा खुलासा केला. अमृता आणि सैफ यांचा घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर मी सैफला भेटली. त्यावेळी अमृता आणि सैफ यांचा काहीही संबंध नव्हता. त्यावेळी सैफ पूर्णत: सिंगल असल्याचं करिनाने सांगितलं. ज्यावेळी सैफने मला प्रपोज केलं, त्यावेळी सैफने 'मला दोन मुलं असून ते माझ्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहेत' असं सैफने सांगितल्याचंही करिनाने म्हटलं आहे. सैफ आणि अमृता यांची मुलगी सारा अली खानशीही करिनाचे चांगले संबंध असल्याचं पाहायला मिळतं.
प्रियंकाने तिच्या लग्नानंतर तर करिनाने तैमुरच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करणच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली. यावेळी करिनाला तु हॉलिवूडमध्ये का काम करत नाही? असा सवाल केला असता करिनाने त्यावर 'मी या ठिकाणाशी अतिशय जोडलेली आहे. माझं कुटुंब, माझं प्रेम, माझा मुलगा सगळंच इथे आहे. प्रियंका अद्वितीय आहे. प्रियंकाचं हे बिनधास्त व्यक्तीमत्व आहे. माझ्याकडे प्रियंका इतकी महत्त्वाकांक्षा नसल्याचं' उत्तर तिने दिलं.
करिना आणि सैफ अली खान २०१२ साली लग्नबंधनात अडकले. २०१६ साली करिनाने तैमुरला जन्म दिला. सैफ अली खान, करिना आणि तैमुर यांचे अनेक फोटो, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.