तापसी आणि जॅकलीनला नव्हे तर या अभिनेत्रीला वरूण म्हणतोय `चलती है क्या नौ से बारा`
१९९७ साली प्रदर्शित झालेल्या `जुडवा` या चित्रपटाचा सिक्वेल येत्या दसर्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मुंबई : १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'जुडवा' या चित्रपटाचा सिक्वेल येत्या दसर्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटामध्ये वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीस आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
आजकाल जुन्या गाण्यांवर नव्याने डान्स स्टेप बसवून 'रिमिक्स' अंदाजामधील व्हिडीओ शेअर करण्याचा ट्रेन्ड आहे. हा मोह वरूण धवनलादेखील आवरता आला नाही. नुकताच वरूणने करिष्मासोबत 'चलती है क्या नौ से बारा' या गाण्यावर व्हिडिओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
जुडवा चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये 'चलती है क्या नौ से बारा' आणि 'उची है बिल्डिंग' ही दोन गाणी नव्या स्वरूपात चित्रित करण्यात आली आहे. त्यापैकी एक गाणं आज रिलिज करण्यात येणार आहे. त्याच्या प्रमोशनसाठी वरूनने करिष्मासोबत हा व्हिडिओ शूट केला.