नवऱ्यानेच लावली बोली; करिश्मा कपूरच्या रिअल लाईफची स्टोरी चित्रपटापेक्षा भयंकर
करिश्माचा एक्स पती संजय कपूर हा मोठा बिझनेसमन आहे.
मुंबई : 90 च्या दशकात करिश्मा कपूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. ती कपूर घराण्याची मुलगी नक्कीच आहे पण करिश्माने फिल्मी दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. करिश्मा केवळ सौंदर्यातच नाही तर अभिनय आणि नृत्यातही कोणापेक्षा कमी नाही. अभिनेत्रीने तिच्या शानदार कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, ज्यामुळे करिश्मा आजही तिच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते.
अभिनेत्री तिच्या करिअरच्या शिखरावर असताना तिने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता. करिश्मा चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसाठी खुल्या पुस्तकासारखे आहे. स्वत: करिश्माने आपल्या लग्नासंबधित काही असे खुलासे केले आहेत जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
लग्नाच्या पहिल्या दिवसापासून छळ झाला : करिश्मा
करिश्माचा एक्स पती संजय कपूर हा मोठा बिझनेसमन आहे. रिपोर्ट्सनुसार करिश्माने सांगितलं होते की, लग्नानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदललं. तिला या लग्नात त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिचा छळ होत असल्याचं तिने सांगितलं.
करिश्माने मित्रांसोबत बोली लावली होती
पिंकविलाच्या वृत्तानुसार, जेव्हा करिश्मा हनीमूनला गेली होती, तेव्हा तिच्या पतीने त्याच्या मित्रांसोबत करिश्मा कपूरसाठी बोलीही लावली होती. जेव्हा तिने पतीची ही गोष्ट पाळली नाही तेव्हा संजयने तिला बेदम मारहाण केली.
२०१४ पासून करिश्मा संजयचं दिल्लीचं घर सोडून मुंबईत स्थायिक झाली होती. संजय-करिश्मा यांना समायरा (१२ वर्ष) आणि कियान राज कपूर (७ वर्ष) असे दोन मुलं आहे. दोन्ही मुलांची कस्टडी कोर्टानं करिश्माकडे सोपवली आहे. 29 सप्टेंबर 2003 रोजी विवाहबद्ध झालेल्या या दाम्पत्यात पहिली कन्या समैराच्या जन्मानंतर खटके उडण्यास सुरुवात झाली. करिश्माने समैराला सोबत घेऊन घर सोडले होते. पण कालांतराने संजय कपूरने तिला मागे आणले. नंतर दोघांनी अल्पकाळ सुखाने संसार केला आणि कियानचा जन्म झाल्यानंतर परस्परांतील वाद चांगलाच चिघळला. आणि या जोडीने घटस्फोट घेतला.