मुंबई : पुन्हा एकदा हॉटनेसचा त़डका घेऊन 'रागिनी एमएमएस २.२' हा सिनेमा आला आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या एकता कपूरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर ती म्हणते की, ‘अंदाज लावा... कोण परत येत असेल?... फोटोत कोण दिसत आहे?’ चाहत्यांनीही एकताने सांगितल्यानुसार अंदाज लावीत हा फोटो ‘रागिनी एमएमएस २.२’चा फर्स्ट लूक असल्याचे म्हटले. . मात्र फोटोत दिसत असलेली अभिनेत्री कोण याचा अंदाज लावणे चाहत्यांना शक्य झाले नाही. दरम्यान, याबाबतचा खुलासा आम्ही करणार असून, एकताच्या या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री करिष्मा शर्मा दिसणार आहे. 


कदाचित तुम्हाला असे वाटले असेल की, या वेबसिरीजमध्ये नवा चेहरा बघावयास मिळेल. परंतु असे घडले नसून, करिष्माचेच पुन्हा एकदा चाहत्यांना जलवे बघावयास मिळणार आहेत. या अगोदर करिष्माला आपण टीव्हीवर बघितले आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखले. एकता कपूरच्या ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेत रैनाची भूमिका साकारणारी करिष्मा या वेबसिरीजमध्ये बघावयास मिळणार आहे. करिष्माने ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेत निगेटिव्ह भूमिका साकारली. याव्यतिरिक्त करिष्माने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेसह ‘प्यार का पंचनामा-२’ या चित्रपटातही काम केले आहे.  



 करिष्मा सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच हॉट फोटो शेअर करीत असते.