karisma Kapoor च्या लेकीचं हटके बॉडी ट्रांसफॉर्मेशन... फोटो व्हायरल
कमी वयात इतकी बदलली आहे करिश्मा कपूरची मुलगी, पाहा तिचं हटके बॉडी ट्रांसफॉर्मेशन
मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. आता करिश्मा मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी करिश्मा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत असतो.
पण आता करिश्मानंतर तिची मुलगी समायरा कपूर चर्चेत आली आहे. समायरा देखील सर्वत्र चर्चित असलेली स्टारकिड आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लोकं करिश्माच्या लेकीबद्दल जाणून घेण्यासाठी देखील उत्सुक असतात.
दरम्यान समायराने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात समायरामध्ये अधिक बदल दिसत आहेत. काळ्या रंगाच्या स्पॅगेटीमध्ये समायराने स्वतःचा हटके अंदाज दाखवला आहे.
समायराचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून लोक तिच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी करिश्माने यावर उत्तर देखील दिलं. करिश्माने समायरा अद्याप डेब्यू करणार नसल्याचं तिने सांगितलं.
स्पॉडबॉय सोबत साधलेल्या संवादात तिने या विषयी खुलासा केला आहे. यावेळी करिष्माला तुझी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, 'हे बिलकूल खरं नाही. सध्या ती अनेक नव्या गोष्टी आत्मसात करत आहे. ती लहान आहे आणि शालेय शिक्षण घेत आहे.' असं करिष्मा म्हणाली.