मुंबई :   १ डिसेंबर २०१ प्रदर्शित होणारा संजय लीला भंसाळींचा 'पद्मावती' हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही बदल आणि कट्स सुचवून या  चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. मात्र विरोधकांचा या चित्रपटाला असलेला विरोध मावळलेला नाही. 


करणी सेनेचा विरोध कायम 


पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावलाय.. चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर करणी सेना ठाम आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉ़र बोर्डाला दिलीये.


चित्रपटात काही बदल 


 सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत मात्र करणी सेनेला हे बदल मान्य नाहीत.. त्यामुळं चित्रपटावरील बंदीवर करणी सेना ठाम आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजप सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल असा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिलाय.