Karthik Kumar: बॉलिवूड किंवा कोणत्याही मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटाच्या चर्चा होतच असतात. एकदा नाते तुटल्यानंतर काही जण मैत्रीचं नात कायम ठेवतात तर काही जण एकमेकांचा चेहरा पाहणेही टाळतात. अनेक जण तर एकमेकांवर आरोप लावूनही मोकळे होतात. अलीकडेच एका मोठ्या गायिकेने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. एक्स पत्नीच्या आरोपांवर प्रथमच अभिनेत्याने उत्तर दिलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत त्यांने तिच्या आरोपांना थेट उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

41 वर्षांची गायिका सुचित्राने अलीकडेच तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर अभिनेता कार्तिक कुमार हा गे असल्याचा खळखबळजनक दावा केला आहे. एक्स पत्नीने केलेल्या आरोपांवर कार्तिकने उत्तर दिले आहे. सुचित्रा आणि कार्तिक कुमार यांनी 2007मध्ये लग्न केलं होतं. मात्र, त्याचे नाते फार काळ काही टिकले नाही. 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता घटस्फोटाच्या 7 वर्षांनंतर सुचित्राने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर म्हणजेच कार्तिक कुमारवर आरोप केले आहेत. कार्तिक कुमार हा गे असल्याचं तिने म्हटलं आहे. एका मुलाखतीत तिने हा दावा केला आहे. 


सुचित्राने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, कार्तिक गे आहे. तसंच, त्याच्यासोबत लग्न करुन मी चुक केली. इतकंच नव्हे तर, कार्तिक आणि धनुषसोबतही घनिष्ठ संबंध होते. सुचित्राच्या या विधानानंतर टॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आता सुचित्राच्या या आरोपांवर कार्तिकने थेट उत्तर दिलं आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.


कार्तिकने शेअर केलेल्या व्हिडिओत तो म्हणतोय की, मी होमोसेक्सुअल आहे किंवा नाही. मला होमोसेक्सुअल असण्यावर लाज वाटणार नागी. सेक्सुलिटीवरुन जितके काही स्पेक्ट्रम आहेत त्यातील एक जरी असेल तरी मला अभिमान वाटेल. मला लाज वाटणार नाही. मला अभिमान वाटेल. मी माझ्या शहरातील प्राइड रॅलीमध्ये सहभागी होईन. सर्व प्रकारच्या सेक्सुलिटी प्राइड रॅलीत सहभागी होईल आणि माझा सहभाग नोंदवेन. यात काहीच लाज वाटण्याचं काम नाही हे अभिमानास्पदच आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Karthik Kumar (@evamkarthik)


कार्तिकने सुचित्राता थेट शब्दात न सुनावता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. मात्र, त्याच्या चाहत्यांना मात्र त्याने लगावलेला टोला समजला आहे. व्हिडिओमध्ये तो मोठ्या आनंदाने बोलताना दिसत आहे. तर, अभिनेत्याच्या या चाहत्यांनी तो LGBTQA+ कम्युनिटीला सपोर्ट करत आहे हे पाहून त्यांनी त्याचे कौतुकही केले आहेत. तर, कार्तिक कुमारची दुसरी पत्नी अमृता श्रीनिवासनने देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे.