एअरपोर्टवरील CISF अधिकाऱ्यांसमोर हात जोडण्याची Kartik Aaryan वर का आली वेळ?
त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन केवळ अभिनयासाठीच नाही तर त्याच्या दमदार अंदाजासाठीही ओळखला जातो. नुकताच तो मुंबई विमानतळावर दिसून आला. यादरम्यान तो विमानतळाच्या एंट्री गेटवर CISF समोर हात जोडताना दिसला.
यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे काय आहे हे संपूर्ण प्रकरण? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे.
CISF अधिकाऱ्यासमोर जोडले हात
कार्तिक आर्यन त्याच्या नवीन कार ( Lamborghini ) लॅम्बोर्गिनीमध्ये मुंबई विमानतळावर पोहोचला. यादरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कार्तिक आर्यन त्याच्या लक्झरी कारमधून खाली उतरताना दिसत आहे.
यावेळी एका माणसाने त्याच्या सनग्लासेसची प्रशंसा केली. यावर कार्तिक आर्यनने गमतीने म्हटलं, 'शेड्स भी गुड, मेरी पेंट भी सेक्सी.' यानंतर तो एअरपोर्टच्या गेटवर पोहोचतो, तिथे तो सीआयएसएफ जवानांशी बोलतो.
व्हिडिओमध्ये त्याचे शब्द नीट ऐकू येत नसले तरी सीआयएसएफचे अधिकारी त्याच्या नवीन कारचे कौतुक करत असल्याची माहिती आहे आणि तो त्याच्या कारकडे पाहून धन्यवाद म्हणतो. यानंतर कार्तिक सीआयएसएफ अधिकाऱ्याचे हात जोडून स्वागत करतो आणि विमानतळाच्या आत जातो.