तरुणांना लग्नासाठी मुली भेटेना, Kartik Aaryan ला मात्र आठवड्यात 180 कोटी मुलीचं प्रपोजल
Kartik Aaryan सोबत लग्न करण्यासाठी 80 कोटी मुलीची रांग, नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई : बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तुफान चर्चेत आला आहे. अभिनेत्याचा 'भूल भुलैया 2' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आहे. सिनेमाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार रविवार जवळ अल्यामुळे सिनेमा लवकरचं 200 कोटींचा गल्ला पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सिनेमा यशाच्या उच्च शिखरावर चढत असल्यामुळे कार्तिक चाहत्यांसोबत आनंद व्यक्त करत आहे.
नुकताचं कार्तिकने सोशल मीडियावर #AskKartik सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. यावेळी अभिनेत्याने चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाची मोकळेपणाने उत्तरं दिली. सध्या सोशल मीडियावर आर्यनच्या #AskKartik सेशनची चर्चा रंगत आहे.
एका चाहत्याने कार्तिकला विचारले की, या आठवड्यात तुला किती प्रपोजल आले आहेत? यावर कार्तिकने उत्तर दिले - एक प्रकारे 180 कोटी प्रस्ताव आले आहेत. चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना कार्तिकने सिनेमाच्या बॉक्स कलेक्शनची रक्कम सांगितली.
पुढे दुसऱ्या चाहत्याने कार्तिकला मजेशीर प्रश्न विचारला. 'तू अनेक मुलींचा क्रश आहेस, यावर तुझ्या भावना?' प्रश्नाचं उत्तर देताना एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये तो Thank You बोलताना दिसत आहे.