कामाठीपुरातील `गंगूबाई` साकारणार आलिया?
चित्रपटात कार्तिक-आलिया पहिल्यांदा एकत्र झळकणार
मुंबई : वीस वर्षांनंतर अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लिला भंसाळी एकत्र काम करणार होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु आता सलमानने चित्रपट साकारण्यास नकार दिल्यामुळे चाहत्यांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटानंतर ते आता एकत्र चित्रपट साकारण्याच्या विचारत होते. भंसाळींसोबत चित्रपट साकारण्यास सलमानने नकार दिला असला तरी अभिनेत्री आलिया मात्र त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
भंसाळींच्या आगामी 'गंगूबाई' चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता कार्तिक आर्यन एकत्र झळकणार आहेत. आलियाच्या आधी अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव चित्रपटासाठी विचारात घेण्यात आले होते. पण सोशल मीडियावर कार्तिक-आलियाच्या चाहत्यांची संख्या पाहता हा चित्रपट आलिया साकारणार आहे.
चित्रपटात कामाठीपुराती चित्र रेखाटण्यात आले आहे. 'गंगुबाई' त्या भागातील मुख्य महिला असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा लेखक हुसैन जैदी लिखीत 'माफिया क्वींस ऑफ़ मुंबई' पुस्तकातील एका पाठावर आधारित असणार आहे.
सध्या आलिया तिच्या वडिलांच्या 'सडक २' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्याचप्रमाणे ती करण जोहरच्या 'तख्त' तर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात ती बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे.
तर, कार्तिक सध्या 'पती पत्नी और वो' चित्रपटात व्यग्र आहे. चित्रपटात कार्तिक शिवाय अभिननेत्री अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचप्रमाणे तो 'भूल भुलैया' आणि 'लव आज कल' चित्रपटात झळकणार आहे.