कार्तिक आर्यनला वाटतेय त्याची करिअर संपण्याची भिती?
कार्तिक आर्यनने या इंडस्ट्रीत यशस्वी स्थान निर्माण केले आहे.
Kartik Aaryan: या वर्षी कार्तिक आर्यनचा भुलभुलैया 2 हा चित्रपट तुफान गाजला. कार्तिक आर्यन कुठलाही स्टार कीड नाही वा त्याला स्वतःहून कोणी येथे आणले आहे. बाहेरून आलेल्या या हरहुन्नरी मुलानं स्वतःहून आपल्या पायावर उभं राहत या इंडस्ट्रीत यशस्वी स्थान निर्माण केले आहे.
कार्तिक आर्यनने या मुलाखतीत बॉलीवूडमधून बाहेरून आलो असल्याचे दुःख काय असते किंवा त्याबद्दल त्याला काय वाटते यावर खुलासा केला होता.
कार्तिकच्या म्हणण्यानुसार, 'फिल्म इंडस्ट्रीत मला सपोर्ट करणारे कोणी नाही. मला माहित नाही की इनसाइडरला कसे वाटेल. बाहेरचा माणूस असल्यामुळे मला माहित आहे की माझा एखादा चित्रपटही फ्लॉप झाला तर माझ्याबद्दल एक वेगळी मतप्रवाह तयार होईल.
ही धारणा माझी कारकीर्द कदाचित नष्ट करेल. यानंतर माझ्यासाठी मोठ्या प्रमाणावर चित्रपट उभारणारा कोणीही नसेल. आऊटसाइडरचे चित्रपट फ्लॉप झाल्यावर धोका मोठा असतो. त्या लोकांना आधार देणारा कोणी नाही.'' अशी भावना त्यानं व्यक्त केली होती.
कार्तिक आणि कियारा अडवाणीचा एक नवा कोरा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्य प्रेम की कथा'च्या रिलीजची तारीख जाहीर असून हे दोघेही यावर्षी 'भूल भुलैया 2' मध्ये दिसले होते.
या मुलाखतीत कार्तिक आर्यनने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. कार्तिक आर्यनने सांगितले की, तो जवळपास दीड वर्षांपासून सिंगल आहे. कार्तिक आर्यन 'फ्रेडी', 'शहजादा' आणि 'कॅप्टन इंडिया' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.