मुंबई :  बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान सध्या हिमाचल प्रदेशमध्ये 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वलचं शूटिंग करत आहेत. सारा आणि कार्तिकला गेल्या काही दिवसांपासून शिमलाच्या रस्त्यांवर फिरताना पाहिलं गेलं आहे. आता या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक आणि सारा शिमलातील पारंपारिक वेशभूषेत दिसत आहेत. दोघांनीही हिमाचली टोपी घातली आहे. सारा आणि कार्तिकच्या फॅन पेजवरुन त्यांचे हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. चाहत्यांकडून दोघांच्या फोटोला चांगल्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.



काही दिवसांपूर्वी कार्तिकने सारासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघांनीही तोंडाला कपडा बांधलेला होता. हा फोटो शेअर करत त्याने सर्वांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. 



शिमलामध्येही दोघे तोंडाला कपडा बांधून फिरत होते. तरीही चाहत्यांनी त्यांना ओळखलंच. त्यानंतर दोघांनीही चाहत्यांसोबत फोटो काढले. शिमलाआधी 'लव आज कल २' चित्रपटाचं शूटिंग दिल्ली, मुंबई, राजस्थानमध्ये करण्यात आलं आहे.



कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' १४ फेब्रुवारी २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 'कुली नंबर १' १ मे २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कार्तिक आर्यन 'पति पत्नी और वो'च्या रीमेकमध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडेही भूमिका साकारणार आहे.