मुंबईः कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील प्रतिभावान स्टार्सपैकी एक आहे. तरुणांमध्ये त्याची खूप लोकप्रियता आहे. कार्तिक आर्यनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एकेकाळी तो सारा अली खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मात्र, या दोघांनी कधीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले नाही. कधी उघडपणे बोललो नाही. आता कार्तिक आर्यनने सारासोबतच्या लिंकअपच्या चर्चांवर मौन सोडले आहे.



सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने 2020 मध्ये 'लव्ह आज कल 2' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या डेटींगच्या अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र, यादरम्यान दोघांनीही आपलं नातं ना स्वीकारलं, ना नाकारलं. रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर दोघेही वेगळे झाले. अगदी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले.


कार्तिक आणि साराच्या रिलेशनशिपची बातमी ही या चित्रपटासाठी प्रमोशनल गिमिक असल्याचंही म्हटलं जात होतं. आता कार्तिकने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.



एका मुलाखतीदरम्यान कार्तिक आर्यनने उत्तर दिले की, सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे अजिबात नव्हतं. आम्हीही माणूस आहोत..सर्व काही प्रमोशनसाठी नसतं.


काही काळापूर्वी कार्तिक आणि सारा एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. दोघेही एकत्र बोलताना दिसले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.


करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये सारा अली खानने सांगितले होते की, तिचं कार्तिक आर्यनवर क्रश आहे. साराच्या या वक्तव्यानंतर #Sartik देखील खूप प्रसिद्ध झाला. यानंतर कार्तिक आणि साराने 2020 मध्ये रिलीज झालेल्या इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल 2' चित्रपटात एकत्र काम केले.