`या` दिवशी होणार विकी कतरिनाचं मुंबईत रिसेप्शन, या आहेत नियम-अटी
कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले
मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. कतरिना आणि विकीच्या लग्नाला खूप मर्यादित लोकं आले होते आणि हे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडलं. पण आता तयारी सुरू झाली आहे ती म्हणजे लग्नाच्या भव्य रिसेप्शनची. मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन मुंबईत होणार आहे आणि त्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत.
बॉलिवूडलाइफने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचं रिसेप्शन जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या रिसेप्शनच्या भव्य स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र या स्वागतासाठी बीएमसीचे सगळे नियम आणि प्रोटोकॉल पाळले जातील. हे रिसेप्शन 20 डिसेंबरला होणार आहे. असंही बोललं जात आहे की, विकी आणि कतरिना कामावर परतण्यापूर्वी लग्नाशी संबंधित सगळे फंक्शन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या रिसेप्शनसाठी सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या दिग्गज कलाकारांना निमंत्रण पाठवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या पाहुण्यांची आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल आणि निगेटिव्ह रिपोर्टसह त्यांना कार्यक्रमात येण्याची परवानगी दिली जाईल.