मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कतरिना कैफ आणि विकी कौशल आता लग्नानंतर आपलं नवा संसार बसवण्यात मग्न आहेत. विकी कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना कैफ पूर्णपणे भारतीय संस्कृतीत रंगली आहे. विकी आणि कतरिना कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याा सोशल मीडियीावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका पार्टी दरम्यानचा त्यांचा हा व्हिडीओ आहे. सध्या सर्वत्र याचं व्हिडीओची चर्चा आहे. व्हिडीओमध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एकमेकांचा हात धरलेल्या विकी आणि कतरिनाकडे सर्वांच्या नजरा वेधल्या आहे. गुरूवारी रात्री होळीच्या निमित्ताने विकी आणि कतरिना धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या वाढदिवसासाठी गेले होते. 


लग्नानंतर विकी आणि कतरिनाची पहिली होळी आहे, आणि होळीच्या मुहूर्तावर दोघे धर्मा प्रोडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांच्या बर्थडे पार्टीला पोहोचले होते. विकी आणि कतरिनाबद्दल सांगायचं झालं तर दोघे कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 


आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देखील दोघे फार रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. अनेकांना त्यांची जोडी फार आवडते. एवढंच नाही तर कतरिना आणि विकी नकळत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.