कतरीना संसाराला लागली, घरातील व्हिडीओ व्हायरल
कतरिना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई : अगदी २०२१ संपता संपता अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) लग्नबंधनात अडकले. अनेक दिवसांपासून यांच्या लग्नांच्या अफवा होत्या. पण या कलाकारांनी लग्न करून चाहत्यांना सुखद धक्का दिला.
लग्नानंतर ही जोडी आता खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला लागली आहे. विकी आणि कतरिनाने लग्ना अगोदरच मुंबईत घर घेतलं होतं. आता या घरात कतरिना रूळताना दिसत आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. यावरून कतरिना घरी खूप छान रूळली जात आहे.
विकी कतरिनाच खास प्रेम
विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या वर्षी ९ डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले. लग्नाआधी जे जोडपे आपल्या नात्याला कोणत्याही प्रकारची संमती द्यायला तयार नव्हते, आज ते जोडपे खुलेआम-ए-इश्क व्यक्त करत आहेत. नुकतेच दोघांच्या लग्नाला एक महिना झाला आणि या निमित्ताने दोघांनी एकमेकांसाठी प्रेमाने भरलेल्या पोस्ट्स लिहिल्या.
चांगली पत्नी होण्याचा कतरीनाचा प्रयत्न
लग्नानंतर कतरिना चांगली पत्नी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कधी ती विकीसाठी जेवण बनवते तर कधी ती विकीला सोडण्यासाठी विमानतळावर जाते. या सगळ्यामध्ये कतरिना कैफचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये अभिनेत्री कधी झाडू तर कधी भांडी धुताना दिसत आहे. हे व्हिडिओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.
भांडी घासताना दिसली कतरिना
कतरिना कैफचा एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ तिच्या स्वयंपाकघरात भांडी धुताना दिसत आहे. ज्यानंतर चाहत्यांच्या खास प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. वहिनी हा जुना व्हिडीओ आहे, पण तरीही तुम्ही काय घरकाम करता? तर दुसऱ्या चाहत्याने चिंता व्यक्त करत म्हटले- वहिनी, तू एकटी का आहेस, कुठे आहेस? हा व्हायरल व्हिडिओ 2020 मधील आहेत. जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन होते.
कतरिनाचे आगामी सिनेमे
वर्क फ्रंटवर, कतरिना मनीष शर्माच्या 'टायगर 3' मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मीसोबत दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे 'फोन भूत' आणि अली अब्बास जफरची 'सुपरहिरो' मालिकाही आहे. या अभिनेत्रीला अलीकडेच विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवनच्या 'मेरी ख्रिसमस'साठी देखील सामील करण्यात आले होते.