मुंबई : अभिनेत्री कॅटरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टेट्सच्या माध्यमातून ही माहिती दिली. अभिनेत्री कॅटरिना कैफने म्हटलं की, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. मी घरीच आयसोलेट आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. मी माझ्या संपर्कातील सर्व लोकांना आवाहन करते की त्यांनीही कोरोना टेस्ट करावी. आपलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी आभार. सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या." (Katrina Kaif Corona Positive)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत, अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झालीये. अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साली, गायक आदित्य नारायण, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल आणि शशांक खेतान यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.


बॉलिवूडमध्ये देखील आता कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. इतकंच नाही तर अनेक टीव्ही सेलिब्रिटींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.