Katrina Kaif- Vicky Kaushal Travel From Economy Class Video : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न बंधनात अडकले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची आणि आता त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची सतत चर्चा आहे. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र, यावेळी तसे झाले नाही. यावेळी कतरिना आणि विकी कौशल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ते एकत्र इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसले. हे पाहिल्यानंतर अनेकांनी कतरिनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर काही नेटकऱ्यांनी त्या दोघांची स्तुती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कतरिना आणि विकीचा हा व्हिडीओ तिच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की ते दोघे इकॉनॉमी क्लासनं प्रवास करत आहेत. व्हिडीओमध्ये, कतरिनानं काळ्या रंगाची हुडी आणि कॅप परिधान केली आहे. तरी देखील कतरिना सुंदर दिसत आहे. कतरिनाच्या शेजारी विकी बसला आहे. विकीनं ग्रे रंगाचं स्वेटशर्ट परिधान केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कतरिनाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्यानं लिहिले की, 'ती जर सलमान खान सोबत असती तर ती आज प्रायव्हेट जेटनं प्रवास करत असती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'विमानात काळा चष्मा कोण घालतं?'


हेही वाचा : बरीये ना ही? स्वत:ला कोरोना संक्रमित करुन घेणाऱ्या गायिकेनं वाढवला ताप


दरम्यान, नुकताच विकीचा 'गोविंदा नाम मेरा' (Govinda Naam Mera) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विकीसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय लवकरच विकीचा 'सॅम बहादूर' आणि 'द इमॉर्टल अश्वत्थामा' हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय कतरिना कैफचा 'भूत पुलिस' (Bhoot Police) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. तर लवकरच तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर 3' (Tiger 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 'टायगर' (Tiger) या फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आहे. तर या चित्रपटात सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफ एकत्र दिसणार आहेत.