मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, नुकतचं कतरिनानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटवरील नाव बदललं आहे. त्यामुळे तिचं अकाऊंट हे हॅक झालं की काय अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. कतरिनाच्या नावच्या जागी दुसऱ्या कोणत्या महिलेचं नाव तिथं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर कतरिनाचं अकाऊंट हॅक झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांनी तर कतरिनाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचं म्हणायला सुरुवात केली. अलीकडेच कतरिना कैफनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेहेंग्यातले अनेक फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यानंतर कतरिनानं फ्लोरल ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये कतरिना सुंदर दिसत होती. हे फोटो शेअर करत कतरिना म्हणाली, मोठ्या खुलासा करण्याच्या प्रतिक्षेत. त्यानंतरच कतरिनाच्या प्रोफाइलमध्ये बदल झाले आहेत. नेटकऱ्यांच्या आता हे लक्षात येत नाही आहे की नक्की हे काय झालं आणि ते कतरिनाचं अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा करत आहेत. 



कतरिनाचे इन्स्टाग्राम फॉलोवर्स हे 66 मिलियन पेक्षा जास्त आहेत. तर कतरिना ही फक्त 500 लोकांना फॉलो करते. तर आता काही लोकांनी कतरिनानं स्वत: अकाऊंटवरचं नाव बदललं असून ही एक प्रमोशनल स्ट्रॅटर्जी म्हटलं आहे. 


वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच फोन भूतमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कतरिनासोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 4 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिना कॉफी विथ करणच्या शोमध्येही दिसणार आहे. पण अभिनेत्री तिचा पती विकी कौशलसोबत कॉफी सोफ्यावर बसताना दिसणार नाही तर फोन भूत, इशान आणि सिद्धांतची स्टार कास्ट दिसणार आहे.