Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनं 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलशी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु होत्या. पुन्हा एकदा कतरिना कैफचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात ती कॉफी घेतलेला हात पोटासमोर घेऊन चालताना दिसली. त्यानंतर लोकांनी कतरिना प्रेग्नंट असल्याचे म्हटले. त्याशिवाय त्यांनी इतकं देखील सांगितलं की प्रेग्नंट पत्नीला भेटण्यासाठी पत्नी कतरिना कैफला भेटण्यासाठी लंडनला गेला आहे. चला तर जाणून घेऊया यात किती सत्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'बॉलिवूडलाइफ'च्या एका जवळच्या सोर्सनं त्यांना दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नानंतर कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या अफवा येऊ लागल्या होत्या. चाहत्यांनी या अफवांवर विश्वास ठेवणं बंद करायला हवं कारण कतरिना प्रेग्नंट नाही. इतकंच नाही तर तिनं अजून फॅमिली प्लॅनिंगविषयी विचार केलेला नाही. कतरिना कैफ तिच्या काही पर्सनल कामासाठी लंडनला गेली आहे आणि स्वत: ला थोडा वेळ मिळावा म्हणून तिथे ती गेली आणि विकी कौशल त्या ट्रिपमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की कतरिना प्रेग्नंट नाही.


कतरिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा आणि सलमान खानचा ‘टाइगर 3’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 6 महिने झाल्यानंतर आता जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित होताच त्या दोघांच्या चित्रपटानं सगळ्यांना वेड लावलं आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, सलमान खान आणि कतरिना कैफच्या चित्रपटानं  एका आठवड्यात 15 मिलियन JPY ची कमाई केली आहे. मात्र, त्या आधी शाहरुख खानच्या पठाणनं एका आठवड्यात 25 मिलियन JPY ची कमाई केली होती.


हेही वाचा : 'ऐकल्यावर क्रुर वाटेल पण बाबा गेले...', वडिलांच्या अकाली निधनावर काय म्हणाली सखी!


2024 म्हणजे यावर्षाच्या सुरुवातील 'मेरी क्रिसमस' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता विजय सेतुपती दिसला होता. कतरिना कैफचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. कतरिना कैफनं अजून तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलेली नाही. कतरिना कैफच्या चाहत्यांना तिच्या आगामी चित्रपटाविषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.