मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी गेल्या महिन्यात जयपूरमध्ये मोठ्या थाटात लग्न केलं. ठराविक पाहुण्यांच्या उपस्थितीत पण आनंदात विकी आणि कतरिनाने नव्या आयुष्याची सुरूवात केली. लग्नापूर्वी दोघांनी कोणतीही घोषणा केली नाही पण लग्नानंतर मात्र त्यांनी सर्व विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या फोटोंनी अनेकांना कपल गोल्स दिले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
लग्नाच्या एक महिन्यांनंतर पुन्हा कतरिनाने एक विकीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'हॅप्पी वन मन्थ माय लव्ह' असं लिहिलं आहे. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर कतरिनाने विकीसोबत फोटो पोस्ट केला. 



दोघांचा फोटो पाहून फक्त सेलिब्रिटींनी नाही तर चाहत्यांनी देखील त्यांच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या दोघांनीही मीडिया आणि लोकांसमोर त्यांचे नाते कधीच स्वीकारले नाही. दोघांनीही लग्नाबाबत मौन बाळगले होते. 9 डिसेंबर रोजी दोघेही राजस्थानमध्ये लग्न केलं.