मुंबई : अभिनेत्री आणि बॉलिवूड म्हटलं की स्वतःच्या शरीराकडे विशेष लक्ष देनं गरजेचे असतेच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅटरिना कैफदेखील नियमित जिममध्ये घाम गाळते. पण नुकतीच ती आलिया भटकडूनही मेहनत करवून घेताना दिसत आहे. 


इंस्टाग्रामवर कॅटरिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री आलिया भट्टकरवून ती स्क्वॉट्स करवून घेताना दिसत आहे. तिने लिहलेल्या कॅप्शनमध्ये अलियाला ३०० स्कॉव्ट्ससाठी ती प्रोत्साहन देत आहे. मात्र मूळात तुम्ही फिटनेस फ्रिक असाल तरीही इतकं मोठं आव्हान पेलणं कठीण आहे. हा गंतमीचा भाग असला तरीही कॅटरिनाची फिगर आणि फिटनेस अनेकींना प्रेरणा देत आहे. 



 


बॉलिवूडमध्ये कॅटरिना आणि आलिया दोघींनीही त्यांची स्वतंत्र ओळख बनवली आहे. नुकताच आलियाने 'राझी' हा मेघना गुलजार यांचा चित्रपट पूर्ण केला आहे. मे २०१८ मध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येईल. 


कॅटरिना कैफ सद्धा 'ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान' च्या चित्रीकरणादरम्यान आहे. तर सलमान खान सोबत तिने 'टायगर जिंदाहै' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट २२ डिसेंबर २०१७ रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे.