Katrina Kaif Used to Message Alia In The Middle Of The Night : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. दोघांची मैत्री खूप वर्षांपूर्वीची आहे आणि आज देखील त्यांच्यात खूप चांगली बॉन्डिंग आहे. काही वर्षांपूर्वी कतरिना कैफनं खुलासा केला होता की ती मध्ये रात्री आलियाला मेसेज करते. ज्यावर आलिया देखील लगेच रिप्लाय करते. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलिया भट्ट आणि कतरिना कैफनं 2017 मध्ये BFFs विथ वोग शोमध्ये एक एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये दोघांनी ट्विनिंग केलं होतं. कतरिना कैफनं शोमध्ये खुलासा केला होता की एकदिवस रात्री तिच्यात आणि आलिया भट्टनमध्ये इन्स्टाग्रामवरून चर्चा झाली होती. 


कतरिना कैफनं सांगितलं की आलिया इन्स्टाग्राम संबंधीत जोडलेल्या समस्यांना दूर करते. मध्यरात्री 2-3 वाजता तिला मेसेज करुन विचारते की माझा फोटो इन्स्टाग्रामवर फीट होत नाही आहे, मी काय करू? आलियानं मला फोटोला थोड लहान करण्याचा सल्ला दिला. मी तिला म्हटलं की मी तेच केलंय, तरी होत नाही. त्यानंतर कतरिनानं सल्ला दिला की कधी-कधी मला या गोष्टीटी जाणीव होते की आता रात्रीचे 1 वाजले आहेत आणि ही लोकांना प्रश्न करण्याची योग्य वेळ नाही. 


आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा हे ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहेत. 2021 मध्येच त्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तरनं केले आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की अजून हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आलेला नाही. 


हेही वाचा : Depression च्या थेरेपीविषयी रणबीर स्पष्टच म्हणाला...; कधीकाळी तोसुद्धा होता नैराश्यग्रस्त


कतरिना कैफ गेल्यावेळी मिस्ट्री-थ्रिलर चित्रपट मेरी क्रिसमसमध्य दिसली होती. त्यात तिच्यासोबत अभिनेता विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर काही चांगली कामगिरी केली नाही. तर सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट 'अल्फा' ला घेऊन चर्चेत आहे. हा एक स्पाय थ्रिलर आहे. आलिया सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान,आजही आलिया आणि कतरिना आजही चांगल्या मैत्रिणी आहे.