...म्हणून कॅटरिनाने एक आठवडा आधीच साजरा केला वाढदिवस
अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर हे त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
मुंबई : अभिनेत्री कॅटरीना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर हे त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दिल्लीला चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने आपला जन्मदिवस एक आठवड्या आधीच साजरा केला. यामागचं कारण म्हणजे १६ जुलैला कॅटरीना कैफ ही ‘आयफा अॅवॉर्ड २०१७' साठी न्यूयॉर्कला असणार आहे. तिने आपल्या चित्रपटाच्या क्रु मेंबर्ससोबत जन्मदिवस साजरा केला.
कॅटरीना कैफचा केक कापतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिचा पहिला प्रियकर रणबीर कपूर पण तिच्या सोबत होता. रणबीर आणि बाकी सगळया क्रु मेंबर्सने वाढदिवसाचं गाणं गायलं.
‘आयफा अॅवॉर्ड २०१७' हा १६ जुलैला न्यूयॉर्कला होणार आहे. त्यासाठी कॅटरीना कैफ ही ‘जग्गा जासूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १४ जुलै ला लगेचच न्यूयॉर्कला जाणार आहे. या अॅवॉर्ड फंक्शनच्या दरम्यान न्यूयॉर्कमध्येही तिचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे.