मुंबई : सिनेविश्वात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांना प्रेक्षक कधी विसरूच शकत नाही. असे चित्रपट काळाबरोबर खूप पुढे जातात. या यादीत एका नावाचा समावेश आहे 'बाहुबली'. प्रभास स्टारर बाहुबलीच्या स्टोरीपासून ते प्रत्येक पात्र लोकांना आवडलं. बाहुबलीला यशस्वी करण्यात 'कटप्पा'चा मोठा वाटा होता. आज आम्‍ही तुम्‍हाला कट्टप्पाच्‍या मुलीची ओळख करून देणार आहोत, जिच्‍या सौंदर्याने बॉलिवूडसृष्टीतील अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कटप्पा उर्फ ​​सत्यराज यांच्या मुलीचं नाव दिव्या सत्यराज आहे आणि ती खऱ्या आयुष्यात हिरोईन आहे. दिव्या चित्रपट जगतापासून दूर राहून सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांना मदत करते. दिव्या तिच्या सामाजिक कार्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. आरोग्य जागृती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल तिला अनेक मोठ्या पुरस्कारांनीही गौरविण्यात आलं आहे.


दिव्या पेशाने एक न्यूट्रीशनिस्ट आहे आणि ती एक NGO देखील चालवते. ज्याद्वारे ती गरीब आणि असाह्य लोकांना मदत करते. एवढंच नाही तर दिव्याने आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन पीएम मोदींना पत्रही लिहिलं आहे.



इतकंच नाही तर कटप्पाची मुलगी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटोही शेअर करत असते. तिचं सौंदर्य आणि तिची शैली अगदी फिल्मी अभिनेत्रींनाही अपयशी ठरवते. इन्स्टाग्रामवर तिला ९२ हजारांहून अधिक लोकं फॉलो करतात.