मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' च्या एपिसोडमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला असा प्रश्न विचारला, ज्याचे योग्य उत्तर देणे शक्य नव्हते. वास्तविक, कॉम्प्यूटर जीने सांगितलेला प्रश्न, अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला विचारला तो प्रश्न चुकीचा होता. स्पर्धकाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर ते उत्तर देखील चुकीचं  ठरलं असंत. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक दिप्ती तुपे यांना संसद आणि संसदेत चालणाऱ्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारला.
 
काही वेळ विचार केल्यानंतर दिप्ती तुपे यांनी  'A'  पर्यायाची निवड केली. पण त्यांनी हे उत्तर दिल्यानंतर बिग बींनी उत्तर चुकीचं असल्याचं सांगितलं. तर या प्रश्नाचं उत्तर 'B' असल्याचं सांगितलं. तर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला प्रश्न नक्की कोणता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- प्रश्न 
भारतीय संसदेच्या सभेच्या सुरुवातीला खालीलपैकी कोणती घटना घडते?
- पर्याय

A. Zero Hour
B. Question Hour
C. Legistative Business
D. Privilege Motion



एका प्रेक्षकाने या प्रश्नावर आक्षेप घेतला आणि स्क्रीनशॉट शेअर करताना म्हणाला, 'मी टीव्हीवर अनेक वेळा फॉलो केले आहे. लोकसभा शून्य तासाने तर राज्यसभा प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रश्न नक्की कोणत्या सभागृहाबद्दल विचारला आहे... याचा उल्लेख केलेला नाही. यामुळेच हा प्रश्न वादग्रस्त ठरत आहे.


शोच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया
शोचे निर्माते सिद्धार्थ बसू म्हणाले की, ' या प्रश्नात कोणतीही चूक नाही. प्रेक्षकांच्या ट्विटला उत्तर देताना ते म्हणाले की सहसा दोन्ही सभागृहांची सुरुवात प्रश्न तासाने होते. जोपर्यंत पिठासीन - स्पीकर किंवा अध्यक्षांकडुन काही बोललं जात नाही. प्रश्नोत्तराच्या तासानंतर शून्य तास प्रक्रिया सुरू होते.'



यानंतर दर्शकाने संसदेच्या वेबसाईटला भेट दिली आणि सांगितले की मी जे सांगत आहे त्यामध्ये तथ्य आहे. यानंतर सिद्धार्थ बसू यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. आता याप्रकरणी पुढे काय होतं. हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.