Kavita Kaushik on Landslide : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कविता कौशिक लॅन्डस्लाइडमध्ये अडकली आहे. ती बद्रीनाथवरून घरी परतत असताना ही लॅन्डस्लाईड झाली. त्यामुळे ती गेल्या चार दिवसांपासून बद्रीनाथच्या जोशीमथमध्ये अडकली आहे. कविता कौशिकनं या 4 दिवसात अनेक लॅन्ड स्लाईड पाहिल्या. कविता यावेळी नवरा रोनित बिस्वास आणि त्यांचा श्वान डॉगसोबत जोशीमठमध्ये असलेल्या आर्मी कॅम्पमध्ये थांबलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

FIR फेम अभिनेत्री कविता कौशिकनं सांगितलं की पोलिस, आर्मी आणि बॉर्डर ऑर्गनाइजेशन खूप मेहनत करत आहेत की लवकरात लवकर रस्ता साफ होईल. पण एक लॅन्डस्लाइड साफ करत असताना दुसरी होते. पण त्यात फार वेळ लागतोय. पण त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं की सगळे टूरिस्ट हे सेफ राहतील आणि त्यांची जितकी सोय करता येईल तितकी करत आहेत. पण तिनं पुढे हे देखील सांगितलं की हे फार भयानक आहे पण मग उत्तराखंडच्या पोलिस आणि आर्मीला सल्यूट करते की सगळ्या टूरिस्टची सेफ्टी आणि कंफर्टकडे लक्ष ठेवत आहेत.  



कविता तिचा नवरा रोनित बिस्वास त्यांच्या श्वान आणि चुलक भाऊ रोनितच्या जन्मदिनी म्हणजे 5 जुलै रोजी बद्रीनाथला गेली होती. तिनं देहरादूनवरून बद्रीनाथपर्यंत ड्रायव्ह केलं आणि त्यानंतर बद्रीनाथचं दर्शन केले. पण येताना ती लॅन्डस्लाईडमध्ये अडकली आणि आता चार दिवसांपासून तिथेच आहे. कवितानं सांगितलं की बद्रीनाथचं दर्शन केल्यानंतर चीनच्या बॉर्डरला असलेल्या माना नावाच्या एका गावात गेले जिथे आपल्या देशाची हद्द संपते. मानाची ट्रीप ही कोणत्याही स्वर्गापेक्षा कमी नाही असं म्हटलं. आम्ही धबधब्यात अंघोळ केली, ट्रेकिंग केली. पण त्याच दिवशी तिथे लॅन्डस्लाईड झाली आणि आम्ही 3 दिवसांसाठी माना येथे अडकलो. काही वेळ तर मला मज्जा येत होती कारण माना खूप सुंदर ठिकाण आहे आणि मला डोंगर आवडतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कवितानं पुढे सांगितलं की '8 जुलै रोजी जेव्हा रस्ता साफ झाला तेव्हा आम्ही जोशीमठ येथे आलो. जसं आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा कळलं की दोन मोठ्या लॅन्ड स्लाईड झाल्या आहेत आणि त्यामुळे हायवे पूर्णपणे बंद झाला आहे. आता इथे आम्ही 3 दिवसांपासून अडकलोय. इथे एक आर्मी कॅम्प आहे. माझ्या नवऱ्याचा एक मित्र आर्मी ऑफिसर आहे आणि ते आमची चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. पण अनेक लोक तिथे अडकले आहेत.' 


कवितानं पुढे सांगितलं की 'रेस्टॉरंट आणि हॉटेलचे लोक वॉशरुम वापरण्यासाठी 200 रुपये घेत आहेत. तर जेव्हा आर्मीच्या लोकांना हे कळलं तेव्हा ते तिथे पोहोचले आणि हॉटेलच्या लोकांना आलेल्या टुरिस्टची मदत करण्यास सांगितले. हजारोंच्या संख्येत गाड्या इथे अडकल्या आहेत आणि तुम्ही या गोष्टीचा विचार करु शकत नाही की किती लोकं असतील.'


हेही वाचा : चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मराठमोळ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत


कवितानं पुढे सांगितलं की '4 दिवसांपासून इथे अडकली आहे आणि आता मला त्रास होतोय. आम्हाला लवकरात लवकर देहरादूनला पोहोचायचं आहे. मला काशीपुरमध्ये असलेल्या एका कार्यक्रमात जायचं आहे. मी त्यामुळे अडचणीत आहे. आशा आहे की मला माझा शब्द पाळता येईल कारण मला शब्द मोडलेलं आवडत नाही.'