मुंबई :  'सिर्फ तुम', 'देर ना हो जाए', 'इक मुलाकात जरूरी है सनम' असे एकापेक्षा एक गाण्यांच्या माध्यमातून रसिकांना वेड लावणारे कव्वालीचे बादशाहा सईद साबरी यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांच्या निधनाने  समस्त बॉलिवूड आणि म्यूझीक विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सईद साबरी यांनी अखेरचा श्वास घेतला तरी ते आणि त्यांचा आवाज कामय प्रत्येकाच्या ह्रदयात जिवंत राहील. त्यांच्या गाण्यांमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. आजही त्यांचे गीत जगण्याला एक नवी उमेद देतात.  असा कलाकार आपल्यातून  गेल्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. 


धक्कादायक गोष्ट म्हणजे, 21 एप्रिल रोजी सईद साबरी यांच्या मोठ्या मुलाचं देखील निधन झालं आहे.  त्यांच्या मुलाचं नाव फरीद साबरी असं आहे. मुलाच्या निधनाने सईद साबरी यांना मोठा धक्का बसला. फरीद साबरी आणि त्यांचे बंधू अमीन साबरी हे 'साबरी ब्रदर्स' या नावाने लोकप्रिय होते. या ब्रदर्सने देशभारात कव्वालीचे अनेक शो केले आहेत.