जेव्हा बिग बींच्या पँटमध्ये घुसला उंदीर
![जेव्हा बिग बींच्या पँटमध्ये घुसला उंदीर जेव्हा बिग बींच्या पँटमध्ये घुसला उंदीर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/10/19/306667-310288-bigbnew70aw1.jpg?itok=oqPV-BIN)
काय आहे हा किस्सा
मुंबई : अमिताभ बच्चन अनेकदा "कौन बनेगा करोडपती' च्या सेटवर आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर करत असतात. असाच एक किस्सा बिग बींनी 'कौन बनेगा करोडपती' च्या 10 व्या सिझनमध्ये शेअर केली. हे ऐकून तुम्ही खूप आश्चर्यचकित व्हाल. 17 ऑक्टोबरला टेलीकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये गोव्याहून गजानन रासम हॉट सीटवर बसले. गजानन यांच्याशी बोलताना एक असं गुपित सांगितलं ज्यामुळे सगळ्यांना हसू आलं.
हॉट सीटवर बसलेले गजानन अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे फॅन आहेत. कौन बनेगा करोडपती च्या सेटवर गजानन यांनी सांगितलं की, मला वाटलं नव्हतं आपली कधी भेट होईल. माझी इच्छा पूर्ण झाली. गजानन यांनी सांगितलं की, मी अमिताभ बच्चन यांची बेलबॉटम पॅन्टची स्टाइल खूप फॉलो करायचो. एवढंच काय बेलबॉटमवाली पॅन्ट देखील मी शिवली होती.
गजानन यांच बोलणं ऐकून अमिताभ बच्चन यांनी बेलबॉटमचा एक किस्सा शेअर केला. बिग बी म्हणाले की, एकदा सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहताना त्यांच्या पॅन्टमध्ये उंदीर घुसला होता. खूप वेळाने हा उंदीर बाहेर काढण्यात यश आलं होतं. या थिएटरचं नाव मी आता सांगू शकत नाही पण या घटनेने मी खूप हैराण झालो होतो. बेलबॉटमच्या पॅन्टची एका वेळेला खूप ट्रेंड होती. एवढंच काय तर फॅशन स्टेटमेंट आहे. शोच्या बद्दल बोलायचं झालं तर गजानन खूप चांगला गेम खेळत आहेत. गजानन यांच्यासमोर एक करोड रुपयेच्या प्रश्नाकरता त्यांच्याकडे दोन लाइफलाइन होत्या. एक करोडच्या प्रश्नाकरता दोन्ही लाइफलाइनचा वापर केला.