मुंबई : अमिताभ बच्चन यांचा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा दहावा सिझन टीआरपीमध्ये सगळ्यात पुढे आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे या शोचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. मंगळवारी प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात डिब्रूगढ आसामची बिनीता जैन एक करोड रुपये जिंकली असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोणत्या प्रकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 13 न्यायाधीशांची सर्वात मोठी संविधान उभारून दिला होता? हा प्रश्न बिनीता यांना 1 करोड रुपयासाठी विचारण्यात आला. त्याच योग्य उत्तर आहे केशवानंद भारती केस. हे योग्य उत्तर देऊन बिनीता जैन या सिझनची पहिली करोडपती बनली आहे. 


अमिताभ बच्चन यांनी जसं सांगितलं की, हे योग्य उत्तर आहे तेव्हा बिनीता यांचा आनंद गगनात मावत नव्हता. काही वेळ त्यांना विश्वासच होत नव्हता की, ती एक करोड रुपये जिंकली आहे. तसेच यासोबत त्यांनी महिंद्राची मरोजा कारदेखील जिंकली आहे. यावर अमिताभ म्हणाले की, तुमचं ज्ञान अद्भुत आहे. 


पुढे अमिताभ बच्चन म्हणाले की, सुरूवातीच्या काळात तुम्ही शिक्षण घेऊ शकला नाहीत. पण मुलांच्याबाबतीत तुम्ही जे शिक्षण घेतलं ते कौतुकास्पद आहे. याच कारणामुळे तुम्ही 1 करोड रुपये जिंकले आहात. या शो दरम्यान बिनीता जैन यांनी आपल्या जीवनातील एक कटू सत्य शेअर केलं आहे. बिनीता जैन यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांनी त्यांच्या नवऱ्याला किडनॅप केलं. दीड वर्ष तपास केल्यानंतर नवऱ्याचा शोध न लागल्यामुळे बिनीता यांनी आपल्या घरी ट्यूशन घ्यायला सुरूवात केली. सोबतच बारावीनंतरच एमकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केलं नाही. अमिताभ बच्चन यांनी बिनीताला सात करोड रुपयांकरता 16 वा प्रश्न विचारलं.  


त्याचं उत्तर बिनीता यांना येत होतं पण त्या उत्तराबाबत ठाम नव्हत्या. म्हणून त्यांनी खेळ तेथेच थांबवला आणि 1 करोड रुपये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर अमिताभ यांनी तिच्या मनातील उत्तर विचारलं तर तिने दिलेलं उत्तर हे योग्य होतं. जर बिनीता पुढे खेळली असती तर त्यांना 7 करोड रुपये जिंकण्याची संधी होती.