मुंबई : रितेश देशमुख (Riteish Deshmukh)आणि जेनेलिया डिसोझा (Genelia D'Souza)सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय कपल आहे. या दोघांच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांच लक्ष असतं. सध्या रितेश आणि जेनेलियाचा 'कौन बनेगा करो़डपती 13'मधला व्हिडीओ सोशल मीडियवर व्हायरल झाला होता. यामध्ये बिग बी यांच्या समोर दोघंही भावूक झाले. 


कार्यक्रमात दोघांनाही रडू आवरेना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन यांनी शोमधील स्टार जोडप्याचे स्वागत केले. येथे मुलांची एक क्लिप दाखवण्यात आली, ही मुले कर्करोगाशी झुंज देत आहेत. प्रोमोमध्ये ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी जेनेलियाची पीडित मुलांविषयीची अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली. जेनेलिया स्वत: ला त्यांची परिस्थिती पाहून रोखू शकली नाही. तिला रडू कोसळलं. रितेश आणि बिग बी ही क्लिपबघून मुळापासून हादरले होते. 



बिग बींकडून देशमुख जोडप्याचं कौतुक


जेव्हा बिग बींनी स्टार जोडप्याचे कौतुक केले आणि समाजात बदल घडवून आणण्यासाठी ते करत असलेल्या सर्व प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले. काही भावनिक क्षणांसह, 'केबीसी 13' चा हा भाग रितेश आणि जेनेलियाच्या रोमान्सबद्दलही चर्चेत आहे. 


शहंशाहच्या डायलॉगमध्ये मोठा बदल 


एका वेगळ्या प्रोमोमध्ये, रितेश एका गुडघ्यावर खाली बसतो आणि अमिताभ बच्चन यांच्या 'शहेनशहा' च्या प्रसिद्ध डायलॉगला रोमँटिक ट्विस्ट देतो. रितेश म्हणतो, 'रिश्ते में हम आपके पती लागते है, लेकिन नाम है जेनेलियाचा नौरा


अशी आहे दोघांची लव्हस्टोरी 


2003 मध्ये रितेश आणि जेनेलिया यांची पहिला सिनेमा 'तुझे मेरी कसम' दरम्यान भेट झाली. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, या जोडप्याने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले. रितेश आणि जेनेलिया हे राहील आणि रियान या दोन मुलांचे पालक आहेत.