मुंबई : अपघातात दोन्ही डोळे गमावल्यामुळे मुलीला आग्रा येथील डिग्री कॉलेजमध्ये बीएससीसाठी प्रवेश नाकारला त्याचं मुलीने आज इतिहास रचला आहे. अनोखा इतिहास रचणाऱ्या मुलीचं नाव आहे हिमानी बुंदेल. हिमानी बुंदेला या 'कोन बनेगा करोडपती 13' च्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी 1 कोटी रूपयांपर्यंत प्रश्न उत्तरांच्या खेळात मजल मारली आहे. हिमानी यांच्या यशानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग्रा येथे राहणाऱ्या हिमानी यांनी रस्ते अपघातात दोन्ही डोळे गमावले. जेव्हा हा दुर्दैवी अपघात झाला त्या 10 वी इयत्तेत शिकत होत्या. अपघातात डोळे गमावले असले तरी त्यांनी हिंमत मात्र सोडली नाही. अशा परिस्थितीत हिमानी यांनी आई-वडिलांना विश्वास दिला की एक दिवस मी माझं नाव मोठं करेल. त्यानंतर हिमानी यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 


त्यानंतर हायस्कूल आणि इंटरमीडिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी लखनऊ विद्यापीठात प्रवेश घेतला आणि केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. काही वर्षे बलरामपूरमध्ये काम केल्यानंतर हिमानी यांची आग्रा हवाई दल स्टेशनच्या केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मध्ये बदली झाली. आता हिमानी केंद्रीय विद्यालयात शिकत आहेत. 


लहानपणापासून हिमानी यांना प्रश्न-उत्तरांच्या खेळात रस होता. एक दिवस 'कोन बनेगा करोडपती'मध्ये जाण्याची त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. त्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत देखील केली. अखेर 'हॉट सीट'वर बसण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. कुटुंबाच्या सहकार्यामुळे याठिकाणी पोहोचणं त्यांना शक्य झालं. 


अपघातानंतर मुलीचं कसं होणार, तिच्यासोबत आता लग्न कोण करणार, तिचं भविष्य कसं असेल अशी भीती हिमानीच्या आई-वडिलांना सतावत होती. पण अखेर तिच्या आई-वडिलांची चिंता नष्ट झाली आहे. हिमानी यांची आई गृहिणी आहेत, तर त्यांचे वडील टूरिज्म सेक्टरमध्ये काम करत आहेत. पण हिमानी यांनी त्यांच्या जिद्दीने अशक्यही शक्य केले आहे.


'शाळेत जात असताना मुलीची दृष्टी गेली. आम्ही कायम चिंतेत असायचो आता हिचं कसं होईल. पण आमच्या मुलीने आम्हाला सगळं काही दिलं आहे. ज्याची आम्ही कधी अपेक्षाही केली नाही. आमची मुलगी आमचा गर्व आहे.' असं हिमाणीचे वडील विजय बुंदेला यांनी सांगितलं आहे. 


'वयाच्या 10 व्या वर्षी अपघातात मुलीची दृष्टी गेली. आम्ही कायम चिंतेत असायचो आता हिचं कसं होईल. पण अशा परिस्थितीत ती कायम आम्हाला आधार देत होती. म्हणायची आई तु काळजी करू नको. मी एक दिवस तुझ नाव मोठं करेल. आज आमच्या मुलीने ते करून दाखवलं आहे. मी फार आनंदी आहे. ' असं मत हिमाणीची आई सरोज बुंदेला यांनी व्यक्त केलं.