Video: जया बच्चन `डॉन`, `सरकार` की...; इशानच्या `त्या` प्रश्नावर अमिताभ काय म्हणाले पाहा
Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: अमिताभ बच्चन `कौन बनेगा करोडपती`मध्ये स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात.
Amitabh About Jaya Bachchan Over Ishan Kishan Question: बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन! चाहत्यांची मनं जिंकण्याची एकही संधी अमिताभ सोडत नाही असं म्हटलं जातं. अमिताभ यांचं व्यक्तीमत्व, त्यांची बोलण्याची शैली, देहबोली या साऱ्याच गोष्टी अगदी भारावून टाकणाऱ्या आहेत. अगदी अनेक कलाकार आणि नामवंत व्यक्तीही अमिताभ यांच्या या शैलीवर भाळतात. खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास अमिताभ बच्चन 1973 साली 'एक नजर' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान जया बच्चन यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर लग्नापासून अगदी आतापर्यंत या दोघांकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं.
इशानने विचारला अनोखा प्रश्न
अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या 15 व्या पर्वामध्ये अँकर म्हणून काम करत आहेत. या कार्यक्रमात स्पर्धकांशी बोलताना ते खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगतात. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या पत्नीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ते फारच रंजक आणि मजेदार उत्तरं देतात. नाताळ विशेष कार्यक्रमामध्ये भारतीय संघातील क्रिकेटपटू इशान किशन आणि महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना सहभागी झाले होते. यावेळेस इशानने जया बच्चन यांच्याबद्दल असाच प्रश्न विचारला. अमिताभ बच्चन हे कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रश्न विचारतात. मात्र यावेळेस इशानने अमिताभ यांना एक अनोखा प्रश्न विचारला.
इशानचा प्रश्न काय होता?
हा प्रश्न विचारताना इशानने आधी अमिताभ यांना पर्याय दिले आणि नंतर प्रश्न विचारला. इशानने अमिताभ यांना त्यांच्या चित्रपटांची नावं पर्याय म्हणून दिली. यामध्ये खुदा गवा, सरकार, डॉन आणि शेहनशाह अशी नावं दिली. यानंतर इशानने, या नावांपैकी कोणतं नाव तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावाच्या आधी लावायला आवडेल? असा प्रश्न अमिताभ यांना विचारला. अमिताभ यांनी थोडा वेळ घेऊन अगदी शांतपणे, "यामध्ये कोणतीच शंका नाही की तिच्या नावाआधी जे टायटल लावलं पाहिजे ते आहे, 'सरकार'!", असं म्हटलं. हे उत्तर ऐकून सारेच हसू लागले.
यापूर्वीही जया यांच्या उंचीवर बोललेले अमिताभ
यापूर्वीच्या एका भागामध्ये अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याबद्दल एक मजेदार विधान केलं होतं. 12 वर्षीय मयंक नावाच्या स्पर्धकाने स्वत:च्या उंचीबद्दल बोलताना आपल्याला छोटी उंची कशी आवडत नाही आणि आपली यामुळे कशी खिल्ली उडवली जाते याबद्दल तो बोलेला. यावर अमिताभ यांनी त्यांच्याबरोबर घडलेल्या किस्सा सांगितला. अमिताभ यांनीही छोट्या उंचीसंदर्भातील समस्येचा एक मजेदार किस्सा सांगितला. मात्र मयंकने तुमची उंची तर फार आहे मग हे कसं घडलं असा प्रश्न विचारला असता, अमिताभ यांनी माझी पत्नी जया बच्चनची उंची तुझ्याऐवढीच आहे, असं म्हटलं होतं.