मुंबई : 'केबीसी'चा 13 वा हंगाम सुरू झाला आहे. प्रीमिअर एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांचे तसेच पहिले स्पर्धक ज्ञान राज यांचे स्वागत केले. ज्ञान राज तसे शोमधून जास्त रक्कम जिंकून जाऊ शकले नाही, परंतु येथे आम्ही तुम्हाला अशा स्पर्धकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आतापर्यंत 'केबीसी' सीझनमध्ये त्यांचे भाग्य बदलले आणि करोडपती झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कौन बनेगा करोडपती' चा पहिला सीझन 2000-01 मध्ये आला. हा सिझन भारतीय नागरी सेवांची तयारी करणाऱ्या हर्षवर्धन नवाथे या विद्यार्थ्याने जिंकला. हर्षवर्धनने केबीसीच्या पहिल्या सीझनमध्ये, एक कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकणाऱ्या पहिला व्यक्तीचा खिताब मिळवला आहे.


त्यानंतर तब्बल चार वर्षांच्या अंतरानंतर 2005 मध्ये कौन बनेगा करोडपतीचा दुसरा सीझन सुरू झाला. या सीझनमध्ये ब्रिजेश द्विवेदी करोडपती बनले. या हंगामात एक विशेष भाग आयोजित करण्यात आला होता, ज्यात बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे अजय देवगण आणि काजोलने विजेते म्हणून मोठी रक्कम जिंकली.


त्यानंतर अमिताभ बच्चन आजारी असल्यामुळे शाहरुख खानने 'KBC' चा तिसरा सीझन होस्ट केला. जो 22 जुलै 2007 रोजी प्रसारित झाला. या हंगामात एकही विजेता नव्हता. त्यानंतर कौन बनेगा करोडपतीच्या चौथ्या हंगामात रहाट तस्लीम एक कोटी रुपये जिंकणारी पहिली महिला ठरली.


'केबीसी'च्या पाचव्या हंगामात, एक साधा कंप्यूटर ऑपरेटर सुशील कुमार पाच कोटी रुपये जिंकणारा पहिले स्पर्धक बनले. या जॅकपॉटने खरोखरच त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. अनिल कुमार सिन्हा या हंगामात 1 कोटी रुपये जिंकणारे दुसरे स्पर्धक होते.


हंगाम 6 मध्ये, मनोज कुमार रैना, सुनमीत कौर साहनी दोघेही करोडपती झाले.


'कौन बनेगा करोडपती' सीझन 7 मध्ये, पुन्हा दोन करोडपती स्पर्धक ताज मोहम्मद रंगरेज आणि फिरोज फातिमा यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये जिंकले. या लोकप्रिय हंगामाची टॅगलाईन होती 'सीखना बंद तो जीतना'.


अचिन आणि सार्थक नरुला या दोन्ही भावांनी 'कौन बनेगा करोडपती' सीझन 8 मध्ये 7 कोटी रुपयांची अविश्वसनीय बक्षीस रक्कम जिंकून इतिहास रचला. तो शोचा पहिला सर्वोच्च बक्षीस रक्कम घेणारा विजेता ठरला. याआधी सुशील कुमारने सर्वाधिक पाच कोटींची रक्कम जिंकले होते.


'कौन बनेगा करोडपती' सीझन 9, ज्याची टॅगलाईन 'जवाब देने का समय आ गया है', सोनी टीव्हीवर सर्वाधिक टीआरपी मिळवणारा शो ठरला. कौन बनेगा करोडपतीच्या नवव्या हंगामात अनामिका मजुमदार एक कोटी रुपये जिंकून विजेती ठरली. ती जमशेदपूर येथील गृहिणी आणि स्वयंसेवी संस्था कार्यकर्ता आहे आणि ती फेथ इन इंडिया या नावाने एक स्वयंसेवी संस्था चालवते.


बिनीता जैन ने 'कौन बनेगा करोडपती'चा दहावा सीझन जिंकला. रक्कम जिंकल्यानंतर तिने एका कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि गुवाहाटीमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि तिच्या मुलांना आणि कुटुंबाला मदत केली.


'केबीसी'च्या 12 व्या हंगामात दोन महिला लक्षाधीश झाल्या. या महिला IPS अधिकारी मोहिता शर्मा आणि कंपनीच्या मॅनेजर नाझिया नसीम आहेत. दोघांनी प्रत्येकी एक कोटी रुपये जिंकले होते. दोन्ही महिलांनी यजमान अमिताभ बच्चन यांना त्यांच्या ज्ञान आणि गेमप्लेने प्रभावित केले.