Baipan Bhari Deva: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची. या चित्रपटानं सध्या पुरता धुमाकूळ घातला आहे. महिलावर्गात तर या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. गेल्या महिन्याभरापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे सोबतच या चित्रपटाला फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. महिलावर्गानंही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यातून काहींनी तर हा सिनेमा चार नाही तर पाच वेळा तरी पाहिला असेल इतका हा चित्रपट महिलावर्गालाही आवडला आहे. सोबतच या चित्रपटाला पुरूषवर्गाचाही तूफान प्रतिसादही लाभला आहे. तरूणवर्गही आवर्जून या चित्रपटाला हजेरी लावतो आहे. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की यावेळी केदार शिंदे यांनी या चित्रपटाच्या यशाबद्दल काय म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केदार शिंदे यांचे सिनेमे पाहणं ही प्रेक्षकांसाठी ही वेगळीच पर्वणी असते. सोबतच त्यांचे सिनेमे हे फूल ऑन इंटरटेनिंग असतात. अशाच त्यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला आहे. त्यामुळे या चित्रपटाला मिळालेले यश पाहता त्यांच्यासाठीही शब्द अपूरे झाले आहेत. 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्यांचा 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी 'बाईपण भारी देवा' इतकी जादू तो बॉक्स ऑफिसवर दाखवू शकला नाही. यावर त्यांना या चित्रपटाच्या अपयशाबद्दल थेट प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी यावर उत्तर दिलं आहे. 


हेही वाचा - अभिनेत्याच्या ओठातून रक्त; किसिंग सीनच्यावेळी कंगनानं हे काय केलं?


त्यांनी नुकत्याच 'महाराष्ट्र टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे आणि 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटावर भाष्य केले आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, “महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याचदरम्यान एक दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यामुळे महाराष्ट्र शाहीर चित्रपटाला कमी स्क्रीन्स मिळाल्या. हा एक भाग आहे.


त्याबरोबरच हा चित्रपट तरुणांनी पाहावं, अशी अपेक्षा मला होती. ते काही फारसं घडलं नाही. तो चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला. हा चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो आवडलाही. शाहीर साबळे यांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे डॉक्युमेंटेशन होणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हा चित्रपट म्हणजे एक पुस्तक आहे. आज ना उद्या कुणीतरी ते उघडून वाचणार”, असं ते म्हणाले. येत्या काही दिवसांतच 'बाईपण भारी देवा' चित्रपटाला 1 महिना पुर्ण होणार आहे तेव्हा आता हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या चित्रपटागृहात आहे.