मुंबई : बॉक्स ऑफिस आता साला अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'केदारनाथ' 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. एक हिंदू टूरिस्ट म्हणजे सारा अली खान आणि एक मुस्लिम पिट्ठू सुशांत सिंह राजपूत यांच्यावर आधारित ही प्रेम कहाणी आहे. एका दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शन एवढी रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमात सुशांत सिंह राजपूत एक गाइड साराला घेऊन भगवान शिवच्या दर्शनाकरता 14 किमीचा प्रवास करतो. केदारनाथ हा सिनेमा 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाची कथा आहे. या महाप्रलयात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. 



सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या सिनेमातून डेब्यू करत आहे. यामुळे या सिनेमाची अधिक चर्चा होत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दिवसाची कमाई अतिशय चांगलीच आहे. शुक्रवार केदारनाथने 7.25 करोड रुपयांची कमाई केली आहे. शनिवारी आणि रविवारी किती कलेक्शन करणार याकडे साऱ्यांचच लक्ष आहे. केदारनाथ सिनेमाचं बजेट 60 करोड रुपये आहे. 


वीकेंडच्या दिवशी केदारनाथ सिनेमाच्या कलेक्शनवर 2.0 सिनेमाचा फरक पडणार आहे. बॉक्स ऑफिसवर रजनीकांत आणि अक्षय कुमारचा 2.0 सिनेमा धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने वर्ल्डवाइड 500 करोड रुपयांची जास्त कमाई केली आहे. तर हिंदी वर्जनने 150 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाचं बजेट 600 करोड रुपयांच आहे. तामिळ, तेलुगु आणि हिंदी भाषेतील सिनेमे 6800 स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.