लग्नानंतर कीर्ति सुरेश इंडस्ट्रीला करणार रामराम? नेमकं काय जाणून घ्या...
Keerthy Suresh to Leave Films : किर्ती सुरेश ही लवकरच वरुन धवणसोबत `बेबी जॉन` या चित्रपटात दिसणार आहे. तर या चित्रपटानंतर ती खरंच इंडस्ट्री सोडणार आहे का?
Keerthy Suresh to Leave Films : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. अॅन्टनी थैटिलसोबत कीर्तिनं लग्न केलं. कीर्ति ही अभिनेता वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' हा चित्रपट करत बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे. या सगळ्यात एक नवी रिपोर्टसमोर आली आहे. ज्यात असं म्हटलं जात आहे की कीर्ति सुरेश ही चित्रपटसृष्टीला रामराम करणार आहे. आता सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे की त्यांची आवडती अभिनेत्री ही इंडस्ट्री सोडते की काय?
कीर्ति सुरुशेविषयी सुरु असलेल्या या अफवांचा खूप परिणाम होत आहे. त्याशिवाय, कीर्ति सुरेशनं कोणत्याही आगामी चित्रपटाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे ती अभिनय क्षेत्रातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, सध्या या फक्त अफवा आहेत आणि त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे कीर्ति सुरेशनं यावर कोणतीही कमेंट केलेली नाही.
कीर्तिचं खासगी आयुष्य हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे तिचं लग्न आहे. तिच्या लग्नानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. कीरर्तिनं गोव्याच्या सेंट रेगिस रिजॉर्टमध्ये शाही लग्न केलं. समारंभात पारंपरिक हिंदू पद्धतीनं आणइ त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. त्यात त्यांच्या कुटुंबातील जवळचे लोक आणि थलपति विजय, तृषा कृष्णन, एटली आणि प्रिया कल्याणी प्रियदर्शन सारखे दिग्गज सहभागी होते. लग्नाच्या काही काळातच कीर्ति कामावर परतली आहे. तिनं लगेच आगामी चित्रपट 'बेबी जॉन' च्या प्रमोशनमला सुरुवात केली. त्यात तिच्यासोबत वरुण धवन देखील दिसला. लग्नानंतरचा तिचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. तिनं या प्रमोशनच्या कार्यक्रमांमध्ये मंगळसूत्रसोबत वेस्टर्न ड्रेस परिधान केले. तिच्या या अंदाजानं सगळ्यांचं लक्ष वेधले आहे.
हेही वाचा : 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर राज्य तर Mufasa : The Lion King नं केली 'इतक्या' कोटींची कमाई
दरम्यान, इतकं असताना चाहत्यांनी तिच्या क्लॅरिटीसाठी उत्साहानं प्रतीक्षा करत आहेत. तर कीर्तिनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आता तिचे चाहते ती या सगळ्या गोष्टींवर समोर येऊन या सगळ्या अफवा आहेत आणि ती इंडस्ट्री सोडणार नाही असं सांगेल याविषयी बोलताना दिसत आहेत.