मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचं नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'सोनू केहंदी' असं हे गाणं आहे. गायक रॉमी आणि ब्रिजेश संदिल्या यांनी हे गाणे गायले आहे. गण्यात सैनिकांची एक तुकडी नृत्य करताना दिसणार आहे. काही दिवसांआधी अक्षयने गाण्यचा टिझर प्रदर्शित केला होता. अक्षयने स्वत:च्या टि्वटर अकाउंटवरून गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा ऐतिहासिक कथेवर आधारलेला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


१८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी झुंज दिली होती. या सिनेमाचं कथानक लढाईत सहभागी असलेले हवालदार ईशर सिंह यांच्या शौर्यावर आधारलेलं आहे. इतिहासातील सर्वात कठीण युद्धातील हे एक युद्ध होते. 
 
'केसरी' सिनेमाचे कथालेखण गिरीश कोहली आणि अनुराग सिंग यांनी केले आहे. सिनेमाची निर्मिती अनेक निर्मात्यांनी मिळून केली आहे. त्यापैंकी एक करण जोहर आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 'केसरी' या चित्रपटाच्या निमित्ताने खिलाडी कुमार शीख सैनिकांच्या तुकडीचा पराक्रम सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. शीख सैनिकांच्या साहसाची गाथा सांगणारा हा 'केसरी' आता बॉक्स ऑफिसरवर दणक्यात कमाई करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.