`शंकराच्या मंदिरात आणि काली मातेला दारूचा नैवद्य चालतो...`, Ketaki Chitale ची वादग्रस्त कमेंट
Ketki Chitale नं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Ketki Chitale Got Trolled Over Wishin Happy New Year and Drinking : सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळे (Ketaki Chitale) ओळखली जाते. केतकी तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा केतकी शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. केतकीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या व्हिडीओत केतकी मद्यपान करताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
केतकीनं तिच्या फेसबूक अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत केतकी मद्यपान करताना दिसली. हा व्हिडीओ शेअर करत केतकीनं 'फादर, त्या सगळ्यांना माफ करा. कारण त्यांना माहित नाही ते काय करतायत. मी काही चुकीचं बोलत असेल तर नक्कीच मला सांगा. मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है। सगळ्यांना माफ करा पण कधी विसरू नका, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा, असे कॅप्शन दिले आहे. यामुळे केतकी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
केतकीच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, "वाह दीदी… लोकांना सांगायचं इंग्रजी परंपरा पाळू नका… आणि आपण ढोसायचं.." अशी कमेंट केली होती. त्यावर नेटकऱ्याला सडेतोड उत्तर देत केतकी म्हणाली, 'मी कधी म्हणाले इंग्रजी परंपरा पाळू नका? 2. सोमरस म्हणजे वाईन. सनातन धर्मात दारू आहे. आमचे देव ही दारू पितात. काली मातेला तर दारूचे नैवेद्य असते. तसेच काही शंकराच्या मंदिरात ही. 3. स्वतः ची संस्कृती शिका, हे मी नेहमी लिहिते आणि सांगते. फरक शिका”, असे केतकी म्हणाली. केतकीनं दिलेल उत्तर पाहता तो नेटकरी म्हणाला, "अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद"
हेही वाचा : Shahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने केतकी चितळे 41 दिवस तुरुंगात होती. तिची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक झाल्यानंतरही ती तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिलेल्या मुलाखतींमध्येही तिच्यासह घडलेला प्रकार बेयादेशीर होता असे म्हटले आहे. तरी अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर केतकीने ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली होती.