Ketki Mategaonkar: अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. केतकी ही उत्कृष्ट गायिका तर आहेच त्याचसोबत तिच्या अभिनयाचीसाठीही ती ओळखली जाते. 'शाळा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाची जोरात चर्चा होती. त्यावेळी तिच्या हलक्या आणि सहज अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. त्यानंतरही तिनं अनेक चित्रपट केले. 'फुंतुरू', 'तानी', 'टाईमपास' अशा पुढे अनेक चित्रपटांतूनही कामं केलेली आहेत. या चित्रपटांतील तिचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला होता. सोबतच या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती. इतक्या वर्षांत केतकी माटेगावकरचा लुक पुर्णपणे बदलला आहे. तिच्या निरागस आणि क्यूट लुक आता पुर्णपणे बदलला असून ती फारच बोल्ड आणि ब्यूटीफुल झाली आहे. तिचे फोटोज हे सर्वत्र व्हायरल होतात. केतकी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरूनही खूप सक्रिय असते आणि सोबतच तिचे असंख्य फॉलोवर्सही आहेत. तेव्हा जाणून घेऊया तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 साली आलेल्या 'लिटिल चॅम्प्स'मधून ती घराघरात पोहचली होती. त्यावेळी ती अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकली नाही परंतु तिच्या गायनानं प्रेक्षकांची मनं मात्र जिंकून घेतली होती. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. त्यातून सोबतच तिचे अनेक अल्बमही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तिला अनेक नामवंत पुरस्कार सोहळ्यांनीही सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याबरोबर अनेक नामवंत गायिका-गायक-संगीतकार यांच्याकडूनही तिला शाबासकीची थाप मिळालेली आहे. तिची आई सुवर्णा माटेगावंकर यादेखील लोकप्रिय गायिका आहेत. सध्या केतकी माटेगांवकरची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तिचा असाच एक आगळावेगळा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. अंकुश असं या चित्रपटाचे नावं आहे. या चित्रपटातून केतकी नव्या रोलमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 


हेही वाचा - 3,00,00,00,00,000! काय आहे Scam 2003 : The Telgi Story, थरारक टीझर पाहाच


केतकी माटेगावकर सध्या आपल्या इन्टाग्राम पेजवरूनही आपले हटके फोटोशूट शेअर करत असते. त्यामुळे तिच्या या फोटोंना चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्स येताना दिसत आहेत. पारंपारिक असो वा मॉडर्न केतकी माटेगावंकर ही कायमच आपल्या हटके लुकनं प्रेक्षकांना घायाळ करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगते. इन्टाग्रामवरही तिनं नुकतेच काही हटके फोटोज शेअर केले आहेत. यावेळी हे फोटो पाहून तुम्हाही तिचे फॅन व्हालच.





यावेळी तिच्या या फोटोंखाली मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि तिच्या फॅन्सनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत.