मुंबईः बॉक्स ऑफिसवर KGF2 सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. यश आणि संजय दत्त यांची भूमिका असलेल्या KGF2च्या कमाईचे आकडे सर्वांनाच चकीत करणारे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा रिलीज होऊन फक्त 4 दिवस झाले आहेत मात्र लवकरच KGFसिनेमा RRRचाही विक्रम मोडणार की काय असं दिसतंय.


KGF सिनेमाचं हिंदी व्हर्जनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाला मिळणार प्रतिसाद पाहाता लवकरच RRRसिनेमालाही मागे टाकणार असं दिसतंय.


RRR सिनेमाने पहिल्या आठवड्यात 1000 कोटींची कमाई केली होती आणि अजूनही RRRची दमदार कामगिरी सुरूच आहे.


 मात्र. त्यानंतर आलेल्या KGFने  4 दिवसातच 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 135.67 कोटी, दुसऱ्या दिवशी 139.25 कोटी, तिसऱ्या दिवशी 115.02 कोटी, चौथ्या दिवशी 132.13 कोटींची कमाई केली.


या सिनेमाच्या फक्त हिंदी वर्जनने 4 दिवसात 200 कोटींची कमाई केली आहे. समीक्षकांच्या अभ्यासानुसार इतक्या कमी वेळेत इतकी प्रचंड कमाई करणारा KGFहा जगातील दुसरा सिनेमा ठरला आहे. 


आपल्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की भारतीय सिनेमाने जगभरात आपला ठसा उमटवला आहे. KGF2ची कमाई अशीच सुरू राहिली तर लवकरच RRR सिनेमालाही हा सिनेमा धूळ चारेल.


KGF2 सिनेमा रिलीज होऊन अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाहीय. फक्त 4 दिवसात 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे, त्यामुळे KGFसोबत रिलीज झालेल्या सिनेमांच्या दिग्दर्शकांना नक्कीच धडकी भरली असेल यात शंका नाही. त्यामुळे हा सिनेमा यापुढे कशी कमाई करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे