मुंबई: कोरोनामुळे अनेक सिनेमांचं शूटिंग पुढे ठकलण्यात आलं होतं. मात्र आता कोरोना होऊ नये म्हणून सगळ्या नियमांचं पालन करून पुन्हा हळू हळू शूटिंग सुरू होत आहे. याच दरम्यान आता केजीएफचा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. केजीएफच्या पहिल्या भागानं चाहत्यांच्या प्रतीक्षा शिगेला पोहोचल्या आहेत. त्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'केजीएफ चॅप्टर 2' सिनेमाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात येत होती. अखेर हा सिनेमा कधी रिलीज होणार याचा खुलासा यशने केला आहे. चित्रपटाचे निर्माते योग्य वेळेची वाट पाहत होते, पण आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांची प्रतीक्षा संपवली आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट 'केजीएफ 2' ची रिलीज डेट सर्वांसमोर आली आहे. कन्नड सुपरस्टार यशने स्वतःच ही रिलीजची तारीख जाहीर केली.


केजीएफ 2' सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. यशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करून चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीज डेट चाहत्यांसोबत शेअर केली. यशने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आजची अनिश्चितता केवळ आमच्या संकल्पाला उशीर करेल पण वचन दिल्याप्रमाणे होईल. आम्ही 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात येऊ. यशची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होत आहे.



अभिनेता संजय दत्तने देखील पोस्टर शेअर केलं आहे. सिनेमाचे डायरेक्टर प्रशांत नील यांनीही हे पोस्टर शेअर केलं आहे. KGF चॅपटर 1 ने अनेक नवीन रेकॉर्ड्स केले होते. त्यानंतर चाहत्यांची प्रतीक्षा वाढली आहे. दुसऱ्या भागात यश आईला दिलेलं वचन पूर्ण करणार का? य़ाकडे सर्वांचं लक्ष आहे. संजय दत्त (Sanjay Dutt), यश (Yash), रवीना टंडन (Raveena Tandon), श्रीनिधि शेट्टी, प्रकाश राज यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार KGF 2मध्ये दिसणार आहेत.