Who Killed Sushant Singh Rajput ? :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज आपल्यामध्ये नाही जाणवत नाही. त्याच्या चित्रपटातील अभिनयामुळे तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. 14 जून 2020 मध्ये वांद्रेमधील घरात त्याच्या रहस्यमय मृत्यूने बॉलिवूडसह सगळ्यांचं धक्का बसला होता. आज या घटनेला चार वर्षे उलटून गेले तरी त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण आहे हे समोर आलेलं नाही. तपास यंत्रणा आजही या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Khan behind the death of Sushant Singh Rajput Twinkle Khanna was told the truth by the cab driver)


सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतची हत्या झाली त्याला ड्रग्स दिले गेले असे अनेक खुलासे करणारे समोर आलेत, असं मीडिया रिपोर्टमधून म्हटलं गेलं. नुकतंच अभिनेत्री ट्विंकल खन्नाने याबद्दल एक खुलासा केलाय. त्यानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहेत. 
एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील कॉलमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय की, आपण खोट्या बातम्यांचे अनेक प्रकरणं पाहिली आहेत. फेक न्यूज आणि त्याचे परिणाम तिने भाष्य केलं. हे लिहतं असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पार्टीत तिने डान्स केल्याची अफवा पसरली तो काळ तिला आठवतो असं ती म्हणाली. फेक न्यूजचा मुलांवर आणि सर्वसामान्यांवर कसा परिणाम होतो याबद्दल तिने लिहिलंय. 


ती पुढे म्हणाली की, ती चेन्नईला गेली असताना एका कॅब ड्रायव्हरशी तिचं सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूबद्दल बोलणं झालं. तो कॅब ड्रायव्हर म्हणाला की, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे तीन खान जबाबदार आहेत. त्याने यूट्यूब आणि व्हॉट्सॲपवर मिळालेल्या माहितीच्या आधारावर हे सगळं भाष्य केलं होतं. त्या चालकाला यूट्यूब आणि व्हॉट्सॲपवरील माहिती खरी वाटत होती. 


त्यावर ट्विंकलने ड्रायव्हरला विचारलं की, तुम्हाला अशा विचित्र आयडिया येतात तरी कशा? हे ऐकून तो म्हणाला, तुम्ही बरोबर आहात सुशांतच्या मृत्यूमागे तीन नाही तर एकच खानचा हात आहे.