शिवमल्हार भक्तीचा द्वार... खंडोबाच्या दर्शनासाठी आला `भक्तांचा महापूर`, पाहा Video
काळजाला भिडणारा खंडोबाचं `भक्तांचा महापूर` भक्तीगीत एकदा ऐकाच ... मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केलं आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिलं आहे तर संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिलं आहे.
'भक्तांचा महापूर' भक्तीगीत : आजपर्यंत तुम्ही अनेक भक्तीगीत ऐकली असतील, पण भक्तांच्या भेटीला खंडोबाचं आणखी एक भक्तीगीत युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अणदूर - नळदुर्गच्या (Andur Naldurg) श्री खंडोबावर पत्रकार सुनील ढेपे (Sunil Dhepe) यांचे भक्तीगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे. अणदूर - मैलारपूर ( नळदुर्ग ) श्री खंडोबावर सुनील ढेपे यांनी आतापर्यंत सात भक्तिगीते लिहिली आहेत. त्याचं 'बघा बघा हो, आला हा भक्तांचा महापूर' (Bhaktancha Mahapur) हे भक्तीगीत रविवारी प्रदर्शित करण्यात आलं.
मुक्तरंग म्युझिक कंपनीने हे भक्तीगीत लॉन्च केलं आहे. संगीत सचिन अवघडे आणि बापू पवार यांनी दिलं आहे तर संदीप रोकडे यांनी आपल्या दमदार आवाजात गायिलं आहे. या भक्तीगीताला खंडोबा भक्तांनी चांगलीच पसंती दिली आहे. सध्या गे भक्तीगीत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Khandoba Songs)
'बघा बघा हो, आला हा भक्तांचा महापूर' भक्तीगीत एकदा ऐकाच
तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि नळदुर्ग ही दोन वेगवेगळी गावे असून, दोन्ही ठिकाणी श्री खंडोबाचे मंदिरे आहेत. पण दोन्ही गावांमध्ये देवाची मूर्ती एकच आहे. श्री खंडोबाचे वास्तव्य अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्ग येथे पावणे दोन महिने असते. (jejuri khandoba)
सध्या श्री खंडोबाचे वास्तव्य मैलारपूर ( नळदुर्ग ) येथे असून, दर रविवारी मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये जवळपास वीस ते तीस हजार भाविक हजेरी लावतात. तर नव्या वर्षी म्हणजे सहा जानेवारी रोजी महायात्रा भरणार आहे, त्यास किमान पाच लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. (khandoba gani)
पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी आतापर्यंत लिहिलेली भक्तीगीते (khandoba bhaktigeete)
नवरी नटली बानाई, देवाचा करार, नळदुर्ग गरजला, श्री खंडोबाची आख्यायिका, खंडोबा डोलतो , स्वप्न पडलंय बानुला आदी भक्तीगीते लोकप्रिय झाली आहेत. ही सर्व भक्तीगीतं भक्तांच्या पसंतीस पडली आहेत